scorecardresearch

Premium

Asian Games: एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केली पदकांची लयलूट, पुरुष संघाने ४x४०० मीटर रिलेमध्ये जिंकले सुवर्ण, तर महिलांनी रौप्यपदक

Asian Games 2023: मुहम्मद अनस, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मुहम्मद अजमल या भारतीय चौकडीने बुधवारी हांगझाऊ येथे आशियाई खेळ २०२३ मध्ये पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Asian Games: Indian athletes complete medal haul at Asian Games men's 4x400m relay gold women's silver
भारतीय चौकडीने बुधवारी हांगझाऊ येथे आशियाई खेळ २०२३ मध्ये पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. आज ११व्या दिवशी देखील भारताने १२ पदके पटकावत जगाला दाखवून दिले की, आम्ही देखील तुम्हाला टक्कर देऊ शकतो. अनस मुहम्मद याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने बुधवारी हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई खेळ २०२३मध्ये पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर महिलांच्या विथ्या रामराज, ऐश्वर्या, कैलाश मिशांच्या संघाने पदक जिंकले. प्राची आणि सुभा वेंकटेशन यांनी ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले.

पुरुषांच्या स्पर्धेत, भारताने हीट १ मध्ये ३:०३.८१ मिनिटांची जलद वेळ नोंदवून, कतार, जपान आणि इराकला मागे टाकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. बेल्जियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या अ‍ॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये जेकब, अनस, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल वरियाथोडी या चौघांनी मिळवलेल्या इव्हेंटमध्येही भारताच्या नावावर विशेष विक्रम आहे. संघाने २:५९.०५ मिनिटे पूर्ण केली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि त्या स्पर्धेत अंतिम फेरीत चॅम्पियन यूएसए बाजी मारत भारताला मागे टाकले होते. त्याची कसर आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भरून काढली.

Asian games 2023: Avinash Sable's double blast in Asian Games won silver medal in 5000-meter race
Asian Games 2023: महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने वाढवली शान! अविनाश साबळेने एशियन गेम्समध्ये सलग दुसरे पदक जिंकत रचला इतिहास
19th Asian Games 2023
Asian Games: भारताने भालाफेकमध्ये रचला इतिहास! नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदकावर कोरले नाव
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: तिरंदाजीमध्ये ओजस-ज्योती जोडीने सुवर्णपदक जिंकताच भारताने रचला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Sift Kaur won the country's 5th gold medal in shooting at Asian Games 2023
Asian Games 2023: सिफ्ट कौरने विश्वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक, ५० मीटर थ्री पोझिशन रायफलमध्ये भारताने नोंदवली हॅटट्रिक

भारतीय महिलांचा ४×४०० मीटर रिले संघ २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आहे. तथापि, भारतीय महिलांचा ४×४०० मीटर रिले संघ १९८२च्या दिल्ली एशियाडपासून या स्पर्धेत पदके जिंकत आहे. भारतीय रिले संघाचा भाग असलेल्या विथ्या रामराजने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी मंगळवारी ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले.

महाराष्ट्रीयन अविनाश साबळेची शानदार कामगिरी पटकावले दोन पदके

अविनाश साबळे याने ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकत चीन मध्ये महाराष्ट्राचे नाव एका उंचीवर नेले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने दोन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात दोन पदके पटकावत शानदार कामगिरी केली.

हेही वाचा: Kishore Jena: आठ वर्षांपूर्वी व्हॉलीबॉल सोडला अन् भालाफेकीला केली सुरुवात, एशियाडमध्ये जिंकले रौप्य पदक; म्हणाला, “दोन वर्षे घरी…”

हरमिलनला रौप्य मिळाले

हरमिलन बैंसने ८०० मीटरमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. एका दिवसापूर्वी १५०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरे रौप्य पदक जिंकले आहे. हरमिलनने २.०३.७५ मीटरमध्ये आपली शर्यत पूर्ण केली.

हेही वाचा: World Cup 2023: ऋषभ पंतची वर्ल्डकपमध्ये एन्ट्री! टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर करतोय मजामस्ती, पाहा Video

भारतासाठी उत्तम ११वा दिवस

आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११वा दिवस भारतासाठी खूप छान ठरला. भारताने एकूण १२ पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील हा दुसरा दिवस होता जेव्हा भारताने १० हून अधिक पदके जिंकली होती. याआधी आठव्या दिवशी भारताला १५ पदके मिळाली होती. आता भारतासाठी पदकांचे शतक झळकावणे खूप सोपे होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2023 indian mens team won gold in 4×400 meter relay women silver medal avw

First published on: 04-10-2023 at 20:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×