Premium

Asian Games 2023: चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम, हाँगकाँगचा १३-०ने पराभव करत गाठली सेमीफायनल

IND vs Hong, Asian Games 2023: भारतीय महिला हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. अपराजित राहून टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली असून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

Asian Games 2023: Indian women's hockey team's winning streak continues defeating Hong Kong 13-0 in the last group match
महिला संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात हाँगकाँगचा १३-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. सौजन्य- (ट्वीटर)

IND vs Hong, Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम आहे. ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहून भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. महिला संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात हाँगकाँगचा १३-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात, भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का आणि दीपिकाने हॅट्ट्रिक साधली, ज्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकी स्पर्धेत हाँगकाँगवर १३-० असा विजय मिळवला. शेवटच्या गट सामन्यातील विजयाने भारतीय संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंदना कटारिया मैदानावर आज जबरदस्त फॉर्ममध्ये होती, तिने दुसऱ्या, १६व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल केले. त्याचप्रमाणे दीप ग्रेसने ११व्या, ३४व्या आणि ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. त्यानंतर दीपिकानेही चौथ्या, ५४व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल केले. संगीता कुमारी, मोनिका आणि नवनीत कौर यांनीही गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारतासाठी, हा सामना त्यांचा पूल ए मधील चौथा सामना होता, ज्यामध्ये टीम इंडियाने चांगल्या गोल फरकाने विजय मिळवला आणि त्यांच्या गटात १० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. या गटात दक्षिण कोरिया सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक पूलमधून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात. हाँगकाँगविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी मैदानावर पूर्ण वर्चस्व दाखवत पहिल्या दोन क्वार्टरमध्ये सहा आणि हाफ टाईमनंतर आणखी सात गोल केले.

सामन्याची सुरुवात धमाकेदार झाली आणि नवनीत कौरच्या पासमुळे वंदनाने अवघ्या दोन मिनिटांत भारताला आघाडी मिळवून दिली. सुरुवातीच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर काही अयशस्वी प्रयत्न करूनही भारताने मैदानावर आपले पराक्रम दाखवत दीपिकाच्या गोलच्या जोरावर आपली आघाडी दुप्पट केली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस मोनिका आणि दीप ग्रेसच्या दोन अतिरिक्त गोलमुळे भारताला चांगली आघाडी मिळवण्यात यश आले.

हेही वाचा: NEP vs IND: डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना साई किशोरला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने केले सूचक वक्तव्य; म्हणाला, “तुम्ही अप्रतिम…”

दुसरा हाफही काही वेगळा नव्हता, कारण भारताने त्यांच्या गतीचा फायदा घेत आणखी सात गोल केले, ज्यात दोन पेनल्टी कॉर्नर हाँगकाँगच्या चुकीमुळे भारताला मिळाले. या वाढलेल्या आघाडीमुळे भारताची खेळावरील पकड आणखी मजबूत झाली आणि त्यामुळे महिला ब्रिगेडने दणदणीत असा विजय नोंदवला.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2023 indian womens hockey teams winning streak continues beating hong kong 13 0 to reach semi finals avw

First published on: 03-10-2023 at 16:35 IST
Next Story
NEP vs IND: डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना साई किशोरला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने केले सूचक वक्तव्य; म्हणाला, “तुम्ही अप्रतिम…”