Asian Games 2023: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक गमावले आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना बलाढ्य चीनशी झाला. त्यांनी अंतिम फेरीत भारताचा ३-२ असा पराभव केला. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. टीम इंडियाने तब्बल ३७ वर्षांनंतर या स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने एशियाडमध्ये रौप्यपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बेस्ट ऑफ फाइव्हमध्ये भारताचा पराभव झाला

सांघिक स्पर्धेत एकूण पाच सामने आहेत. तीन एकेरी आणि दोन दुहेरीचे सामने आहेत. एखाद्या संघाने सलग तीन सामने जिंकल्यास सामना तिथेच संपतो, अन्यथा सामना बेस्ट ऑफ फाइव्ह होतो. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ एकावेळी २-०ने पुढे होता. एकेरीमध्ये लक्ष्य सेन आणि दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर चीनने पुनरागमन करत पुढील तीन सामने जिंकून सुवर्णपदकावर कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतला एकेरीत, चौथ्या सामन्यात ध्रुव कपिला-साई प्रतीक जोडीला दुहेरीत आणि पाचव्या एकेरी सामन्यात मिथुन मंजुनाथला पराभवाचा सामना करावा लागला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

प्रणयची दुखापत महागात पडली

श्रीकांतने जर हा सामना जिंकला असता तर भारताच्या खात्यात सुवर्णपदक आले असते. त्याचवेळी, सध्या भारताचा नंबर वन बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय पाठीच्या दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याचे न खेळणे टीम इंडियाला महागात पडले. त्याच्या जागी मिथुनला खेळावे लागले.

भारताने प्रथमच रौप्यपदक जिंकले

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. या स्पर्धेत भारताला शेवटचे पदक १९८६ मध्ये मिळाले होते. पुरुष संघाने या स्पर्धेत कांस्यपेक्षा जास्त पदक जिंकलेले नाही. १९७४ आणि १९८२ मध्येही भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले होते. पुरुष बॅडमिंटन सांघिक स्पर्धा १९६२ पासून आशियाई खेळांमध्ये खेळली जात आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत ६१ वर्षांनंतर प्रथमच भारताने रौप्य पदक जिंकले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत मागील ३७ वर्षांनंतर भारताला एकही पदक जिंकता आलेले नाही.

लक्ष्यने पहिला सामना जिंकला

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेन आणि शी युची आमनेसामने आले होते. लक्ष्यने हा सामना २२-२०, १४-२१, २१-१७ असा जिंकला. लक्ष्य आणि शी युची यांच्यात पहिल्या गेममध्ये चुरशीची स्पर्धा झाली. लक्ष्यने पहिला गेम २२-२० असा जिंकला. यानंतर शी युचीने पुनरागमन करत २१-१४ असा विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये लक्ष्य एका वेळी १३-९ असा पिछाडीवर होता. यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या १६-१६ अशी बरोबरी केली. यानंतर लक्ष्यने २१-१७ असा गेम जिंकला. अशा प्रकारे भारताने चीनवर १-० अशी आघाडी घेतली.

हेही वाचा: Asian Games: तजिंदरपाल सिंग तूरची ऐतिहासिक कामगिरी! एशियन गेम्समध्ये जिंकले सलग दुसरे गोल्ड मेडल, भारताच्या खात्यात एकूण ४५ पदके

चिराग-सात्विकने एकतर्फी सामना जिंकला

दुसऱ्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांचा सामना पुरुष दुहेरीत योंग डुओ लियांग आणि वेंग चेंग यांच्याशी झाला. चिराग-सात्विकने पहिला गेम २१-१५ असा सहज जिंकला. या सामन्यात भारतीय जोडीने वर्चस्व राखले आणि चीनच्या जोडीला गुण मिळवू दिला नाही. यानंतर चिराग-सात्विकने दुसरा गेमही २१-१८ असा जिंकला. अशा प्रकारे या दोघांनी भारताला चीनवर २-० अशी आघाडी मिळवून दिली.

श्रीकांतनंतर ध्रुव-प्रतिक आणि मंजुनाथ यांचा पराभव झाला

तिसऱ्या सामन्यात भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना एकेरीत शिफेंग लीशी झाला. शिफेंगने पहिल्या गेममध्ये श्रीकांतचा २४-२२ असा पराभव केला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये शिफेंगने श्रीकांतचा २१-९ असा पराभव केला. चीनने दमदार पुनरागमन करत आघाडी १-२ अशी कमी केली. चीनच्या लिऊ युचेन आणि औ झुआनी यांनी ध्रुव कपिल आणि साई प्रतीक या जोडीचा २१-६, २१-१५ असा पराभव केला. पाचव्या सामन्यात चीनच्या वेंग होंगयांगने मिथुन मंजुनाथचा २१-१२, २१-४ असा पराभव केला. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा: Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video

अटीतटीच्या सामन्यात कोरियाचा पराभव करून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली

शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. एचएस प्रणॉयने जिओन ह्योक जिनचा १८-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सेओंग-मिन जोडीने १३-२१, २४-२६ असा पराभव केला. यानंतर लक्ष्यने ली यंग्यूचा २१-७, २१-९ असा पराभव केला. अर्जुन-ध्रुव कपिला जोडीला किम-सुंगसेंग यांच्याकडून १६-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला, परंतु निर्णायक सामन्यात किदाम्बी श्रीकांतने चो जियोंगयापचा १२-२१, २१-१६, २१-१४ असा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले.

Story img Loader