BCCI may send India B team Asian Games Japan: येत्या काही दिवसांत आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचे सामने १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आधीच भारतीय संघाची घोषणा केली होती. पण माध्यमातील वृत्तानुसार, आता बीसीसीआय भारताचा ब संघ जपानला पाठविण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन जपानमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली होती. पण या स्पर्धेदरम्यान दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांवरून बीसीसीआय नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ज्या हॉटेलमध्ये खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ते खूप लहान आहेत. या रूममध्ये खेळाडूंचे किट बॅग ठेवता येतील इतकीही जागा नाही. त्यामुळे बीसीसीआय आता ब संघ पाठवण्याचा तयारीत आहे.

काय आहेत कारणं?

१) माध्यमातील वृत्तानुसार, स्पर्धेदरम्यान खेळाडूंना राहण्यासाठी ज्या हॉटेलची सोय करण्यात आली आहे, ते खूप लहान आहेत. हे रूम इतके लहान आहेत की, खेळाडू आपली किट बॅग देखील ठेऊ शकत नाही.

२) खेळपट्टी

या स्पर्धेसाठी कोरोगी स्पोर्ट्स पार्कची निवड करण्यात आली आहे. इथे आधी बेसबॉलचे सामने खेळवले जायचे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानाची चाचणी करण्यात आलेली नाही.

३) हॉटेल स्टेडियमपासून दूर

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना राहण्यासाठी वेगळी सोय करण्यात आलेली नाही. ज्या मैदानावर सामने खेळवण्यात येणार आहेत, ते हॉटेल स्टेडियमपासून २० किमी अंतरावर आहे.

४) ड्रेसिंग रुमची सुविधा नाही

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुमची सोय असते. पण इथे असं काहीच नसेल. मैदानावर तंबू असतील आणि वॉशरूम स्टेडियमपासून ५०० मीटर अंतरावर असेल. त्यामुळे सुविधांचा अभाव असल्याने बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.