Asian Games 2026 Cricket Schedule Announced: २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं आयोजन यंदा जपानमध्ये केलं जाणार आहे. जपानमधील आइची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. तर काही क्रीडा स्पर्धांची सुरूवात १० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. याचदरम्यान आता भारताचे महिला आणि पुरूष संघाचे सामने कधी, किती वाजता होणार, जाणून घेऊया.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघांनी विजय मिळवला होता आणि यावेळीही ते पदकं जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दरम्यान पुरुष गटातील भारतीय संघाचा पहिला सामना २८ सप्टेंबरला होणार आहे, तर महिला संघ आपला पहिला सामना १८ सप्टेंबरला खेळणार आहे. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक आणि गट यांवर एक नजर टाकूया. प्रत्येक दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना सकाळी ९ वाजता आणि दुसरा सामना दुपारी २ वाजता खेळवला जाईल.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष गटात सहभागी होणारे संघ

गट अ: अफगाणिस्तान, जपान, नेपाळ
गट ब: हाँगकाँग, चीन, मलेशिया, ओमान
थेट प्रवेश मिळालेले संघ: बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष गटाचे संपूर्ण वेळापत्रक

२४ सप्टेंबर २०२६ – अफगाणिस्तान विरूद्ध जपान
२४ सप्टेंबर २०२६ – हाँगकाँग चीन विरूद्ध मलेशिया
२५ सप्टेंबर २०२६ – हाँगकाँग चीन विरूद्ध ओमान
२५ सप्टेंबर २०२६ – अफगाणिस्तान विरूद्ध नेपाळ
२६ सप्टेंबर २०२६ – जपान विरूद्ध नेपाळ
२६ सप्टेंबर २०२६ – मलेशिया विरूद्ध ओमान
२८ सप्टेंबर २०२६ – पाकिस्तान विरूद्ध ब गटात दुसऱ्या स्थानावरील टीम
२८ सप्टेंबर २०२६ – भारत विरूद्ध अ गटात दुसऱ्या स्थानावरील टीम
२९ सप्टेंबर २०२६ – श्रीलंका विरूद्ध अ गटातील विजेता संघ
२९ सप्टेंबर २०२६ – बांगलादेश विरूद्ध ब गटातील विजेता संघ
१ ऑक्टोबर २०२६ – क्वालिफायर-१ विजेता संघ विरूद्ध क्वालिफायर-४ विजेता संघ
१ ऑक्टोबर २०२६ – क्वालिफायर-२ विजेता संघ विरूद्ध क्वालिफायर-३ विजेता संघ
३ ऑक्टोबर २०२६ – कांस्यपदकासाठीचा सामना
३ ऑक्टोबर २०२६ – अंतिम सामना

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे महिला क्रिकेट संघ पुढीलप्रमाणे आहेत. भारत, जपान, बांगलादेश, चीन, श्रीलंका, मलेशिया, पाकिस्तान, थायलंड

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ महिला क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक

१७ सप्टेंबर २०२६ – बांगलादेश विरूद्ध चीन
१७ सप्टेंबर २०२६ – पाकिस्तान विरूद्ध थायलंड
१८ सप्टेंबर २०२६ – श्रीलंका विरूद्ध मलेशिया
१८ सप्टेंबर २०२६ – भारत विरूद्ध जपान
२० सप्टेंबर २०२६ – नंबर-२ टीम विरूद्ध नंबर-३ टीमचे विजेते संघ
२० सप्टेंबर २०२६ – नंबर-१ टीम विरूद्ध नंबर-४ टीमचे विजेते संघ
२२ सप्टेंबर २०२६ – कांस्यपदक सामना
२२ सप्टेंबर २०२६ – अंतिम सामना