Asian Games 2026 India final medal tally and full list: आयची नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काही खेळांमध्ये पदरी निराशा पडली असली तरी अखेरच्या दिवसांमध्ये भारताने सुवर्णपदकांची कसर बऱ्यापैकी भरून काढली. भारताने तिरंदाजी, हॉकी, क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, गोल्फ या प्रकारांमध्ये पुरूष व महिला खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली. यासह भारताने या स्पर्धेत एकूण किती पदकं जिंकली आहेत आणि कितव्या स्थानी देश राहिला आहे, जाणून घेऊया.

१४ दिवसांच्या यशस्वी मोहिमेनंतर, भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण ८५ पदकं जिंकली; यामध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. देशासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.

Asian Games 2026: सुवर्णपदक पटकावणारे भारतीय खेळाडू

  • महिला क्रिकेट – श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक
  • महिला हॉकी – चीनचा १-० असा पराभव करून सुवर्णपदक
  • नेमबाजी – १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक – सुरुची आणि कमलजीत
  • महिला ट्रॅप शूटिंग – नीरू ढांढा
  • मिश्र ट्रॅप शूटिंग – सुवर्णपदक
  • तिरंदाजी – महिला कंपाउंड सांघिक – सुवर्णपदक
  • तिरंदाजी – मिश्र कंपाउंड सांघिक – सुवर्णपदक
  • तिरंदाजी – पुरुष कंपाउंड सांघिक – सुवर्णपदक
  • तिरंदाजी – महिला रिकर्व वैयक्तिक – कुमकुम मोहोद
  • कबड्डी – महिला – सुवर्णपदक
  • कबड्डी – पुरुष – सुवर्णपदक
  • अॅथलेटिक्स – महिला ४×४०० मीटर रिले – किरण पहल, एम.आर. पूवम्मा, प्राची चौधरी आणि विथ्या रामराज
  • बॉक्सिंग – महिला ७५ किलो – लव्हलिना बोर्गोहेन
  • बॉक्सिंग – महिला ६५ किलो – परवीन हुड्डा
  • बॉक्सिंग – पुरुष ८० किलो – अंकुश पंघाल
  • कुस्ती – पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो – सुजीत कलकल
  • गोल्फ – महिला वैयक्तिक – प्रणवी युआरएस
  • क्रिकेट – पुरुष – पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक
  • हॉकी – पुरुष – मलेशियाचा ५-१ असा पराभव करून सुवर्णपदक
  • कुस्ती – पुरुष फ्रीस्टाइल ५७ किलो – अमन सहरावत

Asian Games 2026: रौप्य पदक जिंकणारे खेळाडू

  • कुस्ती – महिला ५३ किलो – अंतिम पंघाल
  • गोल्फ – महिला सांघिक – प्रणवी उर्स, अदिती अशोक आणि दीक्षा डागर
  • तिरंदाजी – पुरुष रिकर्व सांघिक – भारत
  • तिरंदाजी – मिश्र रिकर्व सांघिक – भारत
  • भालाफेक – पुरुष – यश वीर सिंह
  • लांब उडी – पुरुष – मुरली श्रीशंकर
  • १५०० मीटर धावणे – पुरुष – गुलवीर सिंह
  • नेमबाजी – २५ मीटर एअर पिस्तूल महिला – ईशा सिंह
  • लांब उडी – महिला – अंसी सोजन
  • उंच उडी – पुरुष – सर्वेश कुशारे
  • स्क्वॉश – महिला एकेरी – अनाहत सिंह
  • स्क्वॉश – पुरुष एकेरी – अभय सिंह
  • वुशू – महिला ६० किलो – रोशिबिना देवी
  • वेटलिफ्टिंग – महिला ४९ किलो – मीराबाई चानू
  • नेमबाजी – महिला १० मीटर एअर रायफल सांघिक – इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद
  • नेमबाजी – महिला १० मीटर एअर रायफल वैयक्तिक – इलावेनिल वलारिवन
  • नेमबाजी – पुरुष १० मीटर एअर रायफल सांघिक – रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु ढिल्लन
  • शूटिंग — पुरुष १० मीटर एअर रायफल वैयक्तिक — हिमांशु ढिल्लन
  • नेमबाजी – पुरुष ५० मीटर रायफल 3P – भारत
  • नेमबाजी – महिला रायफल 3P सांघिक – भारत
  • मॅरेथॉन – पुरुष – सावन बरवाल
  • शॉटपुट – पुरुष – तजिंदरपाल सिंह तूर
  • कुस्ती – पुरुष GR ९७ किलो – नितेश सिवाच

भारतासाठी कांस्य पदक जिंकणारे खेळाडू

  • तिरंदाजी – पुरुष रिकर्व वैयक्तिक – नीरज चौहान
  • कुस्ती – पुरुष फ्रीस्टाइल ९७ किलो दीपक पुनिया-
  • सेलिंग – महिला डिंगी – नेत्रा कुमानन
  • सेलिंग – स्किफ सांघिक – भारत
  • अॅथलेटिक्स – महिला ५००० मीटर – पारुल चौधरी
  • भालाफेक – पुरुष – रोहित यादव
  • ४०० मीटर हर्डल्स – महिला – हरिता भद्रा
  • कुराश – महिला ७८ किलो – पिंकी बलहारा
  • डिकॅथलॉन – पुरुष – तेजस्विन शंकर
  • अॅथलेटिक्स – महिला ३००० मीटर स्टीपलचेस – पारुल चौधरी
  • २०० मीटर – महिला – हरिता भद्रा
  • नेमबाजी – मिश्र स्कीट सांघिक – अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल
  • रोइंग – पुरुष डबल्स स्कल्स – सलमान खान आणि सतनाम सिंह
  • नेमबाजी – पुरुष स्कीट सांघिक – अनंतजीत सिंह नरुका, मैराज खान आणि भावतेग सिंह गिल
  • सॉफ्टबॉल टेनिस – जय मीणा
  • शूटिंग – महिला स्कीट सांघिक – रायझा ढिल्लन, माहेश्वरी चौहान आणि परिनाज धालीवाल
  • शूटिंग – पुरुष १० मीटर एअर रायफल वैयक्तिक – रुद्रांक्ष पाटील
  • मिश्र मार्शल आर्ट्स – महिला ६० किलो – सुचिका तारियाल
  • बॅडमिंटन – पुरुष सांघिक – भारत
  • शॉटपुट – महिला – मनप्रीत कौर
  • पोल व्हॉल्ट – महिला – बर्निका इलांगोवन
  • टेबल टेनिस – मिश्र दुहेरी – दिया आणि मानुष
  • ४०० मीटर – महिला – प्राची चौधरी
  • स्क्वॉश – मिश्र दुहेरी – जोशना चिनप्पा आणि सेंथिलकुमार
  • स्क्वॉश – पुरुष सांघिक – भारत

Asian Games 2026 Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ पदकतालिका

रँकिंगदेशसुवर्णपदकरौप्यपदककांस्यपदकएकूण पदकं
१चीन१६९८९८३३४१
२जपान८३९३९१२६७
३दक्षिण कोरिया३८४३६८१४९
३भारत२१२७३७८५
५उज्बेकिस्तान२१२५२४७०