India vs Iran, Asian Games 2026 Kabaddi: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वीच भारतीय कबड्डी संघाला गोल्ड मेडलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. भारतीय महिला कबड्डी संघाने दाखवून दिलं की, या संघाला जगातील सर्वोत्तम कबड्डी संघ का म्हणतात. गोल्ड मेडलसाठी झालेल्या सामन्यात भारत आणि इराण हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ३७-३४ च्या फरकाने सामना जिंकून गोल्ड मेडलवर नाव कोरलं. हास इतिहासाला गवसणी घातली आहे.

भारतीय कबड्डी संघ आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने आक्रमक खेळ केला आणि इराणला बॅकफुटवर ठेवत आघाडी घेतली. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर भारतीय संघ २२ -१६ ने आघाडीवर होता. त्यानंतर इराणने देखील पुनरागमन केलं. त्यावेळी भारतीय संघाच्या हातून गोल्ड मेडल जाणार की काय? असं वाटू लागलं होतं. पण शेवटी भारतीय संघाने ३७-३४ च्या फरकाने सामना जिंकून गोल्ड मेडल पक्कं केलं. हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावलेलं हे चौथे गोल्ड मेडल आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने २०१० पासून सुरुवात केली. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिलं नाही.भारतीय महिला कबड्डी संघाने २०१० आणि २०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये गोल्ड मेडलवर कब्जा केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघाने गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यानंतर आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाने गोल्ड मेडलवर नाव कोरलं आहे.

याआधी २०१८ मध्ये झालेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं होतं. भारताला इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय महिला कबड्डी संघ हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. कारण भारतीय संघाने ४ गोल्ड मेडल आणि १ सिल्व्हर मेडलवर नाव कोरलं आहे.