Asian Games 2026, 4x400m Final: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये मंगळवारी भारतीय खेळाडूंनी एकापाठोपाठ एक पदकं पटकावली आहेत. गुलवीर सिंगने ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावलं. त्यानंतर मिश्र रिले स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकावर नाव कोरलं. दणक्यात सुरूवात झाल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंनी ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील भारताचं अॅथलेटिक्समधील पहिलंच सुवर्णपदक आहे.
महिलांच्या ४×४०० रिले स्पर्धेत भारतीय महिलांचा दबदबा..
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या महिलांच्या ४×४०० रिले स्पर्धेत सुरुवातीपासूनच भारतीय महिला खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. २००२ पासून आतापर्यंत झालेल्या ७ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने ६ वेळा पदकावर नाव कोरलं आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बहरीनने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तर भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पाक आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा सुवर्णदपदाची कमाई केली आहे.
ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा असते. पण यावेळी भारताला केवळ एक सुवर्णपदक पटकावता आलं आहे. हे एकमेव पदक महिलांच्या ४×४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळालं आहे. याआधी २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ६ सुवर्णपदक पटकावली होती. दरम्यान आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्समध्ये १ सुवर्णपदकासह ९ रौप्य आणि १४ कांस्य पदकांची कमाई केली.
यासह मिश्र ४×१०० रिले शर्यतीत भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकाला गवसणी घातली. यासह पुरुषांच्या ४×४०० रिले धावण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंनी रौप्य पदकाला गवसणी घातलं त्यानंतर सर्वात शेवटी झालेल्या महिलांच्या ४×४०० रिले शर्यतीत भारतीय महिला खेळाडूंनी सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याआधी गुलवीर सिंगने ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घातली. हे या स्पर्धेतील त्याचं वैयक्तिक तिसरं पदक ठरलं.
