scorecardresearch

Premium

Asian Games: म्हारी छोरी छोरोसे…! भारतीय महिलांची अभिमानस्पद कामगिरी, ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत पारुल-प्रीतीने जिंकली दोन पदके

Asian Games 2023: सोमवारी पारुल चौधरी आणि प्रीती यांनी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. पारुलने रौप्यपदक तर प्रितीने कांस्यपदक जिंकले.

Asian Games: Proud performance by Indian women Parul-Preeti win two medals in 3000m steeplechase
पारुल चौधरी आणि प्रीती यांनी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games 2023: हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदक जिंकण्याची विजयी घौडदौड सुरूच आहे. नेमबाजीत भारतीय खेळाडूंच्या यशानंतर आता भारतीय खेळाडू अ‍ॅथलेटिक्समध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत. सोमवारी पारुल चौधरी आणि प्रीती यांनी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. पारुलने रौप्य, तर प्रितीने कांस्यपदक जिंकले. दोघांनीही इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये एकाच वेळी दोन पदके जिंकली आहेत.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताने पाच पदके जिंकली

महिलांच्या ३०००मीटर स्टीपलचेसचा प्रथमच ग्वांगझू २०१० मध्ये आशियाई खेळांमध्ये समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून भारताने एशियाडच्या चार आवृत्त्यांमध्ये पाच पदके जिंकली आहेत. सुधा सिंगने २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी ललिता बाबरने २०१४ च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. सुधा सिंगने २०१८ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. आता पारुल आणि प्रीती यांनी २०२३ हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. महिलांनी सलग दोन पदक जिंकणे हे असे प्रथमच घडले आहे.

navjot kaur
Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?
pramod bhagat
जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा: यथिराज, प्रमोद, कृष्णाचा अंतिम फेरीत प्रवेश
Anand Mahindra will gift a Thar car to Naushad Khan
Naushad Khan : आनंद महिंद्रांनी पुन्हा जिंकली सर्वांची मनं, सर्फराझ खानच्या वडिलांना खास ‘गिफ्ट’ देण्याची केली घोषणा
Jasprit Bumrah First Reaction Slams Critics With Hard Post After Becoming Number One Test Cricket Bowler IND vs ENG Highlights
जसप्रीत बुमराहची ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया; सणसणीत उत्तर देत टीकाकारांना लावली चपराक

फायनलमध्ये काय झालं?

अंतिम फेरीत बहारीनच्या यावी विन्फ्रेड मुटाइलने ९:१८:२८ या वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. पारुलने ९:२७:६३ वेळेसह दुसरे स्थान पटकावले. त्याचवेळी प्रीती आणि बहरीनच्या मेकोनेन यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. मात्र, शेवटच्या क्षणांमध्ये प्रीतीने अप्रतिम वेग घेत तिसरे स्थान गाठण्यात यश मिळवले. तिने ९:४३:३२ एवढा वेळ घेत कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये बहारीन हा सर्वात यशस्वी देश आहे. त्यांनी या स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारताच्या नावावर एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनने दोन रौप्य, तर जपान आणि व्हिएतनामने प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले आहे. स्टीपलचेस हा एक आव्हानात्मक ट्रॅक आणि फील्ड खेळ आहे ज्यामध्ये खेळाडूंना विविध आव्हाने दिली जातात. या गेममध्ये धावपटूला काही अडथळे आणि पाण्याच्या उड्या पार करून शर्यत पूर्ण करावी लागते.

हेही वाचा: IND vs BAN Hockey: एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घौडदौड सुरूच, बांगलादेशचा १२-०ने उडवला धुव्वा

पारुलने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला

पारुलने नुकत्याच बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीतही आश्चर्यकारक कामगिरी केली. या शर्यतीत ती ११व्या स्थानावर राहिली, पण राष्ट्रीय विक्रम मोडला. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, तिने ९:१५:३१ वेळेसह शर्यत पूर्ण केली. तसेच, ती पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली. त्यानंतर पारुलने ललिता बाबरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. ललिताने रिओ २०१६ ऑलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत ९:१९:७६ वेळेत पूर्ण केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games proud performance by indian women parul preeti win two medals in 3000m steeplechase avw

First published on: 02-10-2023 at 19:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×