scorecardresearch

Premium

Asian Games: तजिंदरपाल सिंग तूरची ऐतिहासिक कामगिरी! एशियन गेम्समध्ये जिंकले सलग दुसरे गोल्ड मेडल, भारताच्या खात्यात एकूण ४५ पदके

Asian Games 2023, Tajinderpal Singh Toor: तजिंदरपाल सिंग तूरने आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळा (शॉटपुट)फेक मध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या खात्यात एकूण पदकांची संख्या आता ४५ झाली आहे.

Athletics: Tajinderpal Singh Toor created history by winning second consecutive gold medal in Asian Games
तजिंदरपाल सिंग तूरने आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळा (शॉटपुट)फेक मध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Tajinderpal Singh Toor won the Gold Medal: भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरने अतिशय नाट्यमय पद्धतीने गोळा (शॉटपुट) फेक मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. तजिंदरपालने २०.३६ मीटरच्या अंतिम थ्रोसह गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. यासह भारतीय खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. याआधी २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

तजिंदरपाल सिंगने तिसऱ्या प्रयत्नात १९.२१ मीटर फेक करून पुढच्या फेरीत प्रवेश केला कारण त्याचे पहिले दोन प्रयत्न फाऊल झाले. त्याने शेवटच्या थ्रोमध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

asian games 2023 india medal tally reach 100
शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!
Asian Games: 19-year-old wrestler Anhalt Panghal won bronze opened account in women's wrestling Pooja-Mansi and Cheema lost
Asian Games: १९ वर्षीय कुस्तीपटू पंघालने जिंकले कांस्यपदक, महिला कुस्तीत खाते उघडले; पूजा-मानसी आणि चीमा पराभूत
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित
Indian Equestrian Dressage Team
Asian Games 2023 : ४१ वर्षांचा दुष्काळ मिटला, घोडेस्वारांच्या सुवर्णपदकासह भारताची पदकतालिकेत मोठी झेप

तजिंदरपालने शानदार पुनरागमन करून सुवर्णपदक जिंकले

गोळाफेक मध्ये, पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये फाऊल केल्यानंतर तूरने तिसऱ्या प्रयत्नात १९.५१ मीटरचा थ्रो केला. त्याचा चौथा थ्रो २०.०६ मीटर होता पण पाचवा थ्रो पुन्हा फाऊल झाला. शेवटच्या थ्रोवर त्याचा सर्वोत्तम प्रयत्न २०.३६ मीटर होता ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तूरने जकार्ता गेम्समध्ये २०.७५ मीटर गोळाफेक करून गोल्ड मेडल जिंकले होते. सौदी अरेबियाच्या मोहम्मद डोडा टोलोने २०.१८ मीटरसह रौप्यपदक जिंकले, तर चीनच्या लिऊ यांगने १९.९७ मीटरसह कांस्यपदक जिंकले.

निखत जरीनचा पराभव

बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला महिलांच्या ५० किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ती थायलंडच्या बॉक्सरविरुद्ध २-३ अशा फरकाने हरली. त्यामुळे आता तिला केवळ कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे. तजिंदरने हे पदक जिंकल्यानंतर भारताच्या नावावर आता १३ सुवर्णपदके झाली आहेत. भारताच्या एकूण पदकांची संख्या ४५ वर पोहोचली आहे ज्यात १६ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

हेही वाचा: Asian Games 2023: चीनमध्ये घुमला महाराष्ट्राचा आवाज! मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णपदकाला गवसणी

भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये दक्षिण कोरियासोबत बरोबरी साधली

महिला हॉकीमध्ये भारतीय संघाने दक्षिण कोरियासोबत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यासह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ३ ऑक्टोबर रोजी भारताचा अंतिम गट टप्प्यातील सामना हाँगकाँगशी होणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. आज भारत पदकांचे अर्धशतक पूर्ण करू शकतो.

हेही वाचा: Asian Games, IND vs KOR: भारतीय महिला हॉकी संघाने गाठली उपांत्य फेरी, दक्षिण कोरियाविरुद्ध साधली १-१ अशी बरोबरी

भारताकडे किती पदके आहेत?

सुवर्ण: १३

चांदी: १६

कांस्य: १६

एकूण: ४५

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games tajinderpal singh toor wins gold in shot put total 45 medals in indias bag avw

First published on: 01-10-2023 at 18:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×