Premium

Asian Games: विश्वविक्रमासह सांघिक सुवर्ण!

नेमबाजीत भारताला तीन पदके; वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य तोमरला कांस्य

in asia competition
दिव्यांश सिंग पन्वर, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि रुद्रांक्ष पाटील; आदर्श सिंह, विजयवीर सिद्धू आणि अनिश भानवाला

वृत्तसंस्था, हांगझो : ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेता रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पन्वर आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. सोमवारी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत एकूण तीन पदके मिळाली. वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने चुरशीच्या लढतीनंतर शूट-ऑफमध्ये कांस्यपदक मिळवले. पाठोपाठ पुरुषांच्याच २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात भारताने कांस्यपदक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे खाते उघडून देताना ठाणेकर रुद्रांक्ष, दिव्यांश आणि ऐश्वर्य या त्रिकुटाने पात्रता फेरीतच १८९३.७ गुणांसह चीन आणि दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान परतवून लावले. रुद्रांक्षने यापूर्वी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवला आहे. वयाच्या १९व्या वर्षीच कमालीची प्रगल्भता दाखवणाऱ्या रुद्रांक्षने ६३२.५, तोमरने ६३१.६, तर दिव्यांशने ६२९.६ गुणांची कमाई करताना एकत्रित जागतिक विक्रमाचाही वेध घेतला. कोरियाला (१८९०.१) रौप्य, तर चीनला (१८८८.२) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games team gold with world record three medals for india in shooting ysh

First published on: 26-09-2023 at 03:45 IST
Next Story
Kapil Dev: हात बांधलेले, तोंडावर कापड…; काय म्हणता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचे अपहरण? गंभीरच्या Videoने उडाली खळबळ