उलानबाटार (मंगोलिया) : सरिता मोर आणि सुषमा शोकीन यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी कांस्यपदके कमावली.
५९ किलो वजनी गटात सरिताने दोन पराभवांनंतर उझबेकिस्तानच्या दिलफुझा एम्बेटोव्हावर तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर मात केली, तर डायना कायुमोव्हाला ५-२ असे हरवले. याचप्रमाणे ५५ किलो गटात सुषमाने कझाकस्तानच्या अलटायन शेगायेव्हावर ५-० असा शानदार विजय मिळवला, तर उझबेकिस्तानच्या सार्बिनाझ जीनबाईव्हाला चीतपट केले.