Premium

आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदाची खात्री -लक्ष्य सेन

भारतीय संघ भक्कम असून, थॉमस चषक विजेतेपदामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.

lakshya sen
लक्ष्य सेन

नवी दिल्ली : भारतीय संघ भक्कम असून, थॉमस चषक विजेतेपदामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही निश्चितपणे विजेतेपद मिळवू असा विश्वास व्यक्त करतानाच बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राला भेटण्यासाठी आतुर असल्याचे सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ सप्टेंबरपासून बॅडमिंटनला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या थॉमस चषक विजेतेपदात लक्ष्यचा वाटा मोलाचा होता. ‘‘सांघिक गटात भारताचा संघ निश्चितपणे बलवान आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत आम्ही सुवर्णपदक मिळवूनच मायदेशी परतू. थॉमस चषक विजेतेपद मिळवणाराच संघ आशियाई स्पर्धेस जात आहे. जगातील कुठल्याही संघाला नमवण्याची आमच्यात क्षमता आहे,’’ असे सेन म्हणाला.

हेही वाचा >>>Golden Ticket: BCCI नं रजनीकांत, सचिन तेंडुलकर, बिग बींना दिलेलं ‘गोल्डन तिकीट’ नेमकं आहे तरी काय?

‘‘सांघिक कामगिरीत आम्ही बलवान आहोत. आमच्यात आत्मविश्वासाचा अभाव नाही. आम्हाला फक्त कोर्टवर उतरून आमचे शंभर टक्के योगदान द्यायचे आहे. एकत्रित प्रयत्न हेच आमचे नियोजन असून, सर्व खेळाडू सकारात्मक विचार करत आहे,’’ असे सेनने सांगितले.

युवा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक रौप्य आणि सुवर्णपदक मिळविणारा लक्ष्य सेन या स्पर्धेत केवळ सांघिक गटात खेळणार आहे. ‘‘आशियाई स्पर्धेचे वातावरण हे राष्ट्रकुल आणि युवा ऑलिम्पिकसारखेच आहे. त्यामुळे आम्ही या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचबरोबर अन्य देशातील खेळाडूंची आणि त्यांच्या खेळाची आम्हाला माहिती होईल. हा अनुभव वेगळाच असतो,’’ असे सेन म्हणाला.

या वेळी केवळ सांघिक विभागात खेळणार असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ असल्याचे सांगून लक्ष्यने ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मला त्याची कामगिरी पाहायला आणि त्याला मैदानात जाऊन प्रोत्साहन देण्यास आवडेल, असे सेन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assured title in asian games lakshya sen amy

First published on: 20-09-2023 at 02:03 IST
Next Story
Golden Ticket: BCCI नं रजनीकांत, सचिन तेंडुलकर, बिग बींना दिलेलं ‘गोल्डन तिकीट’ नेमकं आहे तरी काय?