भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मुंबईत मर्सिडीज बेंझ ईक्यूबी इंडिया न्यू कारच्या लॉन्चिंगला हजेरी लावली. त्यावेळी एमएस धोनीच्या हस्ते ही लक्झरी कार लॉन्च करण्यात आली. यावेळी धोनीने कारसह मस्त स्टाइलमध्ये स्टेजवर एन्ट्री घेतली. यावेळी त्यांनी मंचावर असताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातील एका प्रश्नाला उत्तर देताना, धोनीने एक सुंदर आणि महत्त्वाचा सल्ला दिला.

या कार्यक्रमानंतर धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो लॉन्चिंगदरम्यान प्रश्नांची उत्तरे देत आहे. यादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना तो गुंतवणुकीबाबत सल्ला देताना दिसत आहे. ज्यामध्ये धोनीने गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाचीही काळजी घेतली पाहिजे, असे सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी म्हणतोय की, ‘जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा सर्वात पहिल्यांदा कमाई तुमच्या पालकांना द्या.’

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

महेंद्रसिंग धोनी व्हिडिओमध्ये म्हणाला की, ”माझ्याकडे याआधी अनेक गाड्या आहेत. त्यामुळे मी या प्रश्नाचे नीट उत्तर देऊ शकत नाही. पण मी माझी पहिली लक्झरी कार घेतली याचा मला आनंद आहे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा आधी ते तुमच्या पालकांना द्या. मग बाकीच्या गोष्टी पाहा. पालकांना पगार देणे कधीच बंद करू नये, पण हो गुंतवणूक करायची असेल तर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. मालमत्तेसोबतच तुम्ही अधिक पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता.”

हेही वाचा – IND vs BAN 1st: मेहिदी हसन मिराजचा विक्रमी भागीदारी बाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी फक्त मुस्तफिझुरला…’

एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलयचे तर, सीएसके संघा त्याच्या नेतृत्वाखाली चार वेळा चॅम्पियन बनला आहे. त्याचबरोबर संघ बंदीमुळे दोन हंगाम खेळू शकला नव्हता. चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले. गेल्या मोसमात धोनीने जडेजाकडे कर्णधारपद सोपवले असले तरी जडेजासह संपूर्ण संघाच्या फ्लॉप कामगिरीनंतर धोनीने कर्णधारपद परत घेतले. धोनी आता या मोसमाची सुरुवात कर्णधार म्हणून करेल. पण हंगाम जिंकून पुढच्या मोसमासाठी कर्णधार निवडणे हे त्याचे मोठे लक्ष्य असेल.