India vs New Zealand Live Streaming Details: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी करून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी १-१ सामना गमावला आहे. सुपर ८ फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर साखळी फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दोन्ही संघांकडे इतिहास रचण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता दोन्ही संघांकडे इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. आजवर कुठल्याही संघाला ३ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे हा देखील मोठा रेकॉर्ड असणार आहे. तसेच मायदेशात खेळताना कुठलाही संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावू शकलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला हा रेकॉर्ड देखील आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना कधी खेळवला जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनलचा सामना रविवारी ८ मार्चला खेळवला जाणार आहे.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत-न्यूझीलंड फायनल सामना किती वाजता सुरू होणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. त्याआधी संध्याकाळी ५:३० वाजता पॉप स्टार रिकी मार्टीनचा शो असणार आहे.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनलचा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल.

भारत-न्यूझीलंड फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.