AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नुकताच स्कॉटलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड संघांत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर स्कॉटलंडचा ३-० असा धुव्वा उडवला. मालिकेतील शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालेली ट्रॉफी चर्चेचा विषय ठरली आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मिचेल मार्शला ट्रॉफी देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वास्तविक, जी ट्रॉफी किंवा कप दिला, जे एका छोट्या वाडग्याप्रमाणे दिसत होते.

यजमान संघ अनेकदा अशी ट्रॉफी देतात जी विजेत्या संघासाठी एक चांगली आठवण ठरु शकेल, परंतु स्कॉटलंडने दिलेली ट्रॉफी केवळ विनोदच ठरली आहे. विजयानंतर मार्शला वाडग्यासारखी ट्रॉफी देण्यात आली. तेव्हापासून चाहते स्कॉटलंड क्रिकेटला सतत ट्रोल करत आहेत. कारण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २६,००० किलोमीटरचा प्रवास करुन स्कॉटलंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळण्यासाठी पोहोचला होता.

चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष –

ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयानंतर कर्णधार मिचेल मार्शला चषक देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॉफी स्वीकारताना खुद्द मिचेल मार्शही चकित झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर मिचेल मार्शने आपल्या संघातील इतर खेळाडूंना ट्रॉफी दाखवली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. ट्रॉफी पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू हसायला लागले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम

ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या ट्रॉफीत काय आहे विशेष?

काही रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शला मालिका जिंकल्यानंतर देण्यात आलेली ट्रॉफी सामान्य नव्हती. त्या वाडग्याला स्कॉटिश स्मरणिका म्हणतात. ज्याचा वापर व्हिस्की ठेवण्यासाठी होतो. व्हिस्की हे स्कॉटलंडचे राष्ट्रीय पेय असल्याने, विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाला स्कॉटिश क्रिकेट बोर्डाने हे स्कॉटिश स्मृती चिन्ह दिले. हे वाडगं पाहून संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ हसायला लागला होता. आता त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.