Australia vs Sri Lanka: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ८ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने दमदार शतकी खेळी केली. यासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.
Australia vs Sri Lanka: ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका सामन्याचे हायलाईट्स
AUS vs SL Live: निसांकाचं शतक, श्रीलंकेचा विजय
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ८ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने दमदार शतकी खेळी केली. यासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.
AUS vs SL Live: श्रीलंकेला विजयासाठी ५ षटकात इतक्या धावांची गरज
श्रीलंकेला विजयासाठी ३० चेंडूत ४१ धावांची गरज आहे.
कुसल मेंडिस अर्धशतकी खेळीनंतर ५१ धावा करत झेलबाद झाला. मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना बाद झाला. यासह श्रीलंकेची ९७ धावांची भागीदारी तुटली आहे. श्रीलंकेला आता ४२ चेंडूत विजयासाठी ६९ धावांची गरज आहे.
पथुम निसांकाचं अर्धशतक
पथुम निसांकाने ३२ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह अर्धशतकी खेळी साकारली.
कुसल मेंडिसची अर्धशतकांची हॅटट्रिक
कुसल मेंडिसने २९ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. टी-२० विश्वचषकातील मेंडिसचं हे सलग तिसरं अर्धशतक आहे.
AUS vs SL Live: श्रीलंकेची दमदार सुरूवात!१० षटकात विजयासाठी इतक्या धावांची गरज
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने दमदार सुरूवात केली आहे. श्रीलंकेला १० षटकात विजयासाठी ८९ धावांची गरज आहे.
AUS vs SL Live: श्रीलंकेला पहिला मोठा धक्का! कुसल परेरा परतला माघारी
श्रीलंकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. कुसल परेरा १ धाव करून माघारी परतला आहे.
AUS vs SL Live: हेड- मार्शची तेज तर्रार सुरूवात, श्रीलंकेकडून दमदार शेवट; ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली होती. पण शेवटी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आणला. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांची गरज आहे.
AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाला ७ वा धक्का
ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला आहे. कुपर कॉनोली अवघ्या ३ धावा करून माघारी परतला आहे.
AUS vs SL Live: पथुम निसंकाने घेतला कॅच ऑफ द टूर्नामेंट! ग्लेन मॅक्सवेल परतला माघारी
पथुम निसंकाने या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच घेत ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडलं आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/2023410438063734883?s=20
AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज तंबूत
ग्रीन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिचेल मार्श देखील बाद होऊन माघारी परतला आहे.
AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का! हेड परतल माघारी
ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला आहे. हेड ५६ धावा करून माघारी परतला आहे.
AUS vs SL Live: ट्रॅव्हिस हेडचं अर्धशतक
सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाची दमदार सुरूवात
पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली आहे ७ षटकात ऑस्ट्रेलियाने ८४ धावा केल्या आहेत.

Australia vs Sri Lanka Live Cricket Score Updates, T20 WC 2026: ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
