महिलांच्या विश्वचषकात ‘अ‍ॅशेस’ लढाई

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमने-सामने असले की क्रिकेटचाहत्यांना दर्जेदार खेळाची पर्वणी पक्की.

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमने-सामने असले की क्रिकेटचाहत्यांना दर्जेदार खेळाची पर्वणी पक्की. पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये रंगणारा हा थरार महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहे. २०१०मध्ये वेस्ट इंडिज तर २०१२मध्ये श्रीलंकेत त्यांनी जेतेपद पटकावले होते.  चालरेट एडवर्ड्स इंग्लंडसाठी फलंदाजीत हुकमी एक्का आहे. सारा टेलरकडूनही इंग्लंडला मोठय़ा अपेक्षा आहेत. इंग्लंडची प्रमुख गोलंदाज अन्या श्रुसबोलेने स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले आहेत. कट्टर प्रतिस्पध्र्याना चीतपट करण्यासाठी अन्याकडून भेदक गोलंदाजीची अपेक्षा आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर ऑस्ट्रेलियाचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. फलंदाजीत मेग लॅनिंग जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aussie women have nemesis england in sight in world t20