झॅम्पाचा पराक्रम : ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे बांगलादेशचा १५ षटकांत फक्त ७४ धावांत डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. झॅम्पाने १९ धावांत ५ बळी घेत सिंहाचा वाटा उचलला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बांगलादेशकडून शमिक हुसैनने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार आरोन फिंच (४०) आणि डेव्हिड वॉर्नर (१८) यांनी ५८ धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.

लेग-स्पिनर अ‍ॅडम झॅम्पाच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम पाच बळी घेण्याच्या कामगिरीच्या बळावर गुरुवारी ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि उपांत्य फेरीच्या आशा शाबूत ठेवल्या.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे बांगलादेशचा १५ षटकांत फक्त ७४ धावांत डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. झॅम्पाने १९ धावांत ५ बळी घेत सिंहाचा वाटा उचलला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बांगलादेशकडून शमिक हुसैनने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार आरोन फिंच (४०) आणि डेव्हिड वॉर्नर (१८) यांनी ५८ धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.

ऑस्ट्रेलियाने ६.२ षटकांत विजयी लक्ष्य ओलांडत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून दुसरे स्थान प्राप्त केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या दोन्ही संघांच्या खात्यावर सहा गुण आहेत. परंतु ऑस्टे्रलियाची निव्वळ धावगती १.०३१ आहे, तर आफ्रिकेची ०.७४२ आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : १५ षटकांत सर्व बाद ७३ (शमिक हुसैन १९; अ‍ॅडम झॅम्पा ५/१९, जोश हॅझलवूड २/८) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ६.२ षटकांत २ बाद ७८ (आरोन फिंच ४०; तस्किन अहमद १/६)

सामनावीर : अ‍ॅडम झॅम्पा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia beat bangladesh win match t20 world cup akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या