IND vs AUS 2nd Test Highlights in Marathi: गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवत भारतावर मोठा विजय नोंदवला आहे. दुसऱ्या डावात भारताने १७५ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटीत भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी फळी पूर्णपणे फेल ठरली. भारताचे सर्व फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात आणि भागीदारी रचण्यात अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करू शकली नाहीत. भारतीय संघाने निःसंशयपणे १२८ धावा केल्या आहेत, परंतु यादरम्यान त्यांनी ५ मोठ्या विकेट गमावल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाची टॉप ऑर्डकर सपशेल फेल ठरली. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली आणि शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. तर रोहित शर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निराश केले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला पण भागीदारी रचू शकले नाही.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

हेही वाचा – Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

ॲडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया सर्वबाद झाली. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ५ विकेट्सवर १२८ धावा करत दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी क्रीजवर होते. या दोघांकडून चांगल्या भागीदारीची आशा होती. पण असे होऊ शकले नाही कारण मिचेल स्टार्कने पंतला पहिल्याच षटकात बाद करत पॅव्हेलियनमध्ये धाडले.

हेही वाचा – NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती

स्टार्कने विकेटसह दिवसाची सुरूवात केल्यानंतर पॅट कमिन्सने विकेट्स घेण्याची जबाबदारी घेतली. रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणाला बाद करत भारताला धक्के दिले. त्याचवेळी नितीशने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत काही उत्कृष्ट फटके मारत संघाला १५७ धावांच्या पुढे नेत डाव गमावण्याचा धोका टळला. मात्र, कमिन्सने रेड्डीला बाद करत आपले ५ विकेट पूर्ण केले. शेवटची विकेट स्कॉट बोलँडच्या नावे झाली, ज्याने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही महत्त्वाच्या टॉप ऑर्डरच्या विकेट घेतल्या होत्या. संपूर्ण भारतीय संघ केवळ १७५ धावांवर बाद झाला आणि त्यामुळे टीम इंडियाला दोन्ही डावात २०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

हेही वाचा – Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

नितीश रेड्डीची दोन्ही डावात शानदार फलंदाजी

पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या १८० धावांत सर्वबाद झाली. संघात पुनरागमन करणारा कर्णधार रोहित शर्मा दोन्ही डावात अपयशी ठरला. त्याच्या मधल्या फळीत खेळण्याचाही संघाला फायदा झाला नाही आणि त्याला दोन्ही डावात मिळून केवळ ९ धावा करता आल्या. तर पर्थ कसोटीचे स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीही या सामन्यात अपयशी ठरले. युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी याने दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने दोन्ही डावात ४२-४२ धावा केल्या. .

भारत १८० धावा करत सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हेडच्या शतकाच्या जोरावर ३३७ धावा केल्या. ३०० अधिक धावांचा टप्पा गाठताच भारतीय संघाला सामन्यातून बाहेर केले. ट्रॅव्हिस हेडने १४० धावांची शानदार खेळी केली, तर मार्नस लबुशेननेही उत्कृष्ट ६२ धावांची खेळी केली. टीम इंडियाची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. जसप्रीत बुमराहने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. मोहम्मद सिराजनेही त्याला काही प्रमाणात साथ दिली. पण हर्षित राणाने मात्र निराश केले.

Story img Loader