Australia vs Oman: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले. तर आहे त्या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं आहे. पण जाता जाता ऑस्ट्रेलियाने ओमानवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ओमानचा डाव अवघ्या १०४ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान अवघ्या ९.४ षटकात पूर्ण केलं आणि ९ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ओमानचा डाव अवघ्या १६.२ षटकात अवघ्या १०४ धावांवर आटोपला. ओमानकडून फलंदाजी करताना सलामीला आलेला कलीम शून्यावर माघारी परतला. कर्णधार जतिंदर सिंगने १७ धावा केल्या. तर हमद मिर्झाने १६ धावा केल्या. तर वसीम अलीने ३२ धावा केल्या. ओमानकडून एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ॲडम झाम्पाने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ३३ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर ट्रॅव्हिस हेडने १९ चेंडूत ६ चौकारांच्या साहाय्याने ३२ धावांची खेळी केली. तर जोस इंग्लिसने नाबाद १२ धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान अवघ्या ९.४ षटकात पूर्ण केलं आणि ९ गडी राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतून बाहेर या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा ग्रुप बी मध्ये समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतील ४ पैकी २ सामन्यात विजय मिळवता आला. तर २ सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुख्य बाब म्हणजे आयटीएल