कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (४३ चेंडूंत ६५ धावा) निर्णायक खेळीनंतरही तळाच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुरशीच्या झालेल्या महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने नऊ धावांनी हार पत्करली. या पराभवामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रकुलमधील सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत १६२ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव १९.३ षटकांत १५२ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर शफाली वर्मा (११) आणि स्मृती मानधना (६) लवकर बाद झाल्याने भारताची २ बाद २२ अशी स्थिती झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (३३) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी रचली. मात्र, सलग दोन षटकांत जेमिमा, हरमनप्रीत आणि पूजा वस्त्रकार (१) बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे १५व्या षटकात २ बाद ११८ अशी धावसंख्या असणाऱ्या भारताचा डाव १५२ धावांत आटोपला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia beats india by 9 runs in cricket final in cwg 2022 zws
First published on: 09-08-2022 at 06:03 IST