scorecardresearch

IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा भारतात मोठा पराक्रम; मोडला दहा वर्षे जुना विक्रम

IND vs AUS 4th Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटीत कांगारू संघाने एक मोठा विक्रम केला आहे. हा विक्रम सर्वाधिक षटके खेळण्याच्या बाबतीत आहे.

IND vs AUS 4th Test Updates
ख्वाजा आणि ग्रीन (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

IND vs AUS 4th Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या अहमदाबाद कसोटीत (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) कांगारू संघाने पहिल्या डावात शानदार खेळ दाखवला आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांच्या जोरावर १० वर्ष जुना विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर या दोघांच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४८० धावा केल्या आहेत.

१०० पेक्षा जास्त षटके खेळण्याचा विक्रम –

चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नवा विक्रम केला. भारतात १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया असा संघ बनला आहे, ज्याने कसोटीच्या एका डावात १०० पेक्षा जास्त षटके खेळली आहेत. ऑस्ट्रेलियाने या बाबतीत इंग्लंडला मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून ९० षटकांची फलंदाजी केली, त्यानंतर आजचा खेळ सुरू झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली. अशा स्थितीत गेल्या दहा वर्षांत भारतात सर्वाधिक वेळा १०० षटके खेळणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे.

याआधी इंग्लंड संघाने कसोटी सामन्यात १०० पेक्षा जास्त षटके खेळली होती. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही तीन वेळा भारतात १०० हून अधिक षटके खेळली आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली, त्यामुळे कांगारू संघाने हे स्थान गाठले.

उस्मान ख्वाजाने ४२२ चेंडू खेळले –

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने ४२२ चेंडूत १८० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने २१ वेळा चेंडू सीमापार पाठवला. याशिवाय कॅमेरून ग्रीनने १७० चेंडूत ११४ धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने १८ चौकार मारले. उस्मान आणि कॅमेरूनमध्ये २०८ धावांची भागीदारी केली. ख्वाजा आणि ग्रीनच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: ख्वाजा-ग्रीनचे दमदार शतक! ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारला ४८० धावांचा डोंगर

पाचव्यांदा ३०० पार धावसंख्या –

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतात पाचव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये ३००हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियापूर्वी इंग्लंडने भारतात ३०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती सध्या मजबूत दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 17:09 IST