तालिबानच्या निर्णयांमुळे अफगाणिस्तान क्रिकेटसमोर मोठे संकट; ऑस्ट्रेलियाने पहिली क्रिकेट कसोटी पुढे ढकलली

गेल्या दशकात अफगाणिस्तानची ओळख बनलेल्या क्रिकेटचे भवितव्य अंधारात आले आहे.

Australia cricket postpone Afghanistan test until situation clearer
(फोटो सौजन्य – PTI)

अफगाणिस्तानचा तालिबानने ताबा मिळवल्यापासून देशात अशांततेचे वातावरण आहे. परदेशी नागरिक, अधिकाऱ्यांसोबतच अनेक अफगाण नागरिकांनीही देश सोडला असून आता तालिबानी राजवटीचा काळ सुरू झाला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनासोबतच देशात खेळांबाबत सतत भीतीचे ढग असून त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या दशकात या देशाची ओळख बनलेल्या क्रिकेटचे भवितव्य अंधारात आले आहे. तालिबानच्या प्रमुखांनी देशाच्या क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, संकट कायम आहे. त्यांनतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिली अफगाणिस्तान क्रिकेट कसोटी पुढे ढकलली आहे.

क्रिकेटला पाठिंबा देण्याच्या गप्पा मारणाऱ्या तालिबानने या प्रकरणी आपले कट्टरपंथी रूप दाखवून केवळ पुरुष क्रिकेट संघालाच परवानगी दिली जाईल, महिला संघाला नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. ऑस्ट्रेलियन वाहिनी एसबीएसला दिलेल्या मुलाखतीत तालिबान नेत्याने म्हटले होते की, क्रिकेट महिलांसाठी आवश्यक श्रेणीत येत नाही, त्यामुळे त्यांना परवानगी दिली जाणार नाही. तालिबानने देशातील खेळ किंवा मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रात महिलांच्या सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. इस्लामच्या शरिया कायद्यानुसार, महिलांना त्यांच्या शरीराचा भाग दिसण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही खेळात भाग घेण्याची परवानगी नाही असे तालिबानने म्हटले होते.

तालिबानच्या या निर्णयानंतर देशातील महिलांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे मार्ग सध्यातरी बंद झाले आहेत. अशा स्थितीत पुरुष क्रिकेट संघाचे भवितव्यही धोक्यात आले होते. ऑस्ट्रेलिया होबार्टमध्ये अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवणार आहे, मात्र आता कसोटी सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “आम्‍ही २१-२२’च्‍या वेळापत्रकाची माहिती घेतली आहे. ज्यात अफगाणिस्तानविरुद्ध नियोजित पुरुष कसोटी पुढे ढकलण्‍याचा समावेश आहे. आम्ही या हंगामात बीबीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे तसेच भविष्यात दोन्ही अफगाणिस्तान संघांचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहोत. व्होडाफोन पुरुषांच्या ऍशेस मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट तयारीची खात्री करून, विस्तारित ऑस्ट्रेलियन संघ १ ते डिसेंबर दरम्यान रेडलँड्स, ब्रिस्बेन येथे सामना खेळेल. ब्रिस्बेन येथील इयान हीली ओव्हल येथे ९ ते १२ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया अ संघाचा सामना इंग्लंड लायन्सशी होणार आहे,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

अलिकडच्या वर्षांत अफगाणिस्तानची क्रिकेटमध्ये झालेली उल्लेखनीय वाढ ही या खेळाची सर्वात मोठे यश आहे. पण तालिबानच्या ताब्यानंतर संघर्षग्रस्त देशात अफगाणिस्तान क्रिकेटला धोका निर्माण झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia cricket postpone afghanistan test until situation clearer abn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या