ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ३ टेस्ट, ३ वनडे आणि एक टी २० सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढच्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या संघासोबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्या जाण्याबाबत साशंकता आहे. ग्लेन मॅक्सवेलचा गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतीय वंशाच्या मुलीशी साखरपुडा झाला होता. त्यामुळे पुढच्या वर्षी लग्न असल्याने ग्लेन मॅक्सवेलला दौऱ्याबाबत शंका आहे.

“मला वाटते की, खूप चांगलं आहे आम्हाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने १९९८ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. मी या दौऱ्यावर जाणार की नाही, हे सर्वस्वी माझ्या होणाऱ्या पत्नीवर अवलंबून आहे. कारण माझं लग्न त्या दरम्यान आहे. त्यामुळे याचं उत्तर देण्यास मी योग्य व्यक्ती नाही.”, असं मॅक्सवेलनं सांगितलं. लग्न होणाऱ्या पत्नीने पुढे ढकललं तर जाणार का?, असा प्रश्न विचारताच मॅक्सवेलने उत्तर दिलं. “तसं होणं कठीण आहे. कारण आम्ही यापूर्वी दोनदा लग्न पुढे ढकललं. त्यामुळे मला माहिती आहे लग्न पुढच्या वर्षीच होणार आहे.”, असं त्याने सांगितलं.

मॅक्सवेल आणि विनी रमन मागील दोन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपून दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मॅक्सवेल भारताचा दुसरा ऑस्ट्रेलियन जावई झाला आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय तरूणी मासूम सिंघासोबत लग्न केले आहे. दोघेही आयपीएल पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते.

Cricket: ऑस्ट्रेलिया पुढच्या वर्षी करणार पाकिस्तान दौरा; “२४ वर्षानंतर आमच्या…”

टी २० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना १२ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान दौऱ्याची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक

  • पहिली कसोटी- ३ मार्च ते ७ मार्च, कराची
  • दुसरी कसोटी- १२ मार्च ते १६ मार्च, रावलपिंडी
  • तिसरी कसोटी- २१ मार्च ते २५ मार्च, लाहोर
  • पहिला एकदिवसीय सामना- २९ मार्च, लाहोर
  • दुसरा एकदिवसीय सामना- ३१ मार्च, लाहोर
  • तिसरा एकदिवसीय सामना- २ एप्रिल, लाहोर
  • टी २० सामना- ५ एप्रिल, लाहोर