India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १७ मार्चपासून सुरु झालीय. मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ५ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. विशाषापट्टणम येथे या मालिकेचा दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा दमछाक केली. स्टार्कने चेंडूचा वेगवान मारा करून भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांपुढं भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली अन् भारताचा आख्खा संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या सामन्यातही भेदक गोलंदाजी केली. भारताच्या पाच फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवण्यात स्टार्क यशस्वी झाला. भारतासाठी सलामीला मैदानात उतरलेल्या शुबमन गिलला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार रोहित शर्माने १५ चेंडूत १३ धावा केल्या. रोहित आणि शुबमन दोघेही स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराटने ३५ चेंडूत ३१ धावा केल्या. अक्षर पटेलने सावध खेळी करत २९ चेंडूत २९ धावांची नाबाद खेळी केली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: १४० किमीचा वेगवान चेंडू अन् २५ सेकंदात स्टंपिंग, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर क्लासेनने धवनला केलं आऊट, VIDEO
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
IPL 2024 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RR vs LSG: आधी तिखट बाऊन्सरने हेल्मेट तोडल, मग दुसर्‍याच चेंडूवर उडवला त्रिफळा; बोल्टची भेदक गोलंदाजी

नक्की वाचा – IND vs AUS 2nd ODI : वर्ल्डकप २०२३ मध्ये ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेईंग XI? कर्णधार रोहित शर्माने केला खुलासा, म्हणाला…

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज सीन अबॉटने ३ विकेट घेतल्या. तर नथन एलिसने भारताच्या दोन फलंदाजांना बाद केलं.तसंच सूर्यकुमार यादव या सामन्यातही शून्यावर बाद झाला. मागील सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा के एल राहुल आजच्या सामन्यात फक्त ९ धावा करून माघारी परतला. हार्दिक पांड्यालाही धावांचा सूर गवसला नाही. हार्दिक एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर जडेजाने डाव सावरत १६ धावा केल्या. पण त्यालाही भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवता आला नाही.