scorecardresearch

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ख्वाजाचे शतक हुकले; ऑस्ट्रेलिया ५ बाद २३२

सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या (२१९ चेंडूंत ९१ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याची ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली.

पीटीआय : सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या (२१९ चेंडूंत ९१ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याची ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ८८ षटकांत ५ बाद २३२ अशी धावसंख्या होती. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची २ बाद ८ अशी स्थिती होती. मात्र ख्वाजाने स्टिव्ह स्मिथच्या (५९) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी १३८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मग ट्रॅव्हिस हेड (२६) आणि कॅमरून ग्रीन (नाबाद २०) यांनी चांगले योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ८८ षटकांत ५ बाद २३२ (उस्मान ख्वाजा ९१, स्टीव्ह स्मिथ ५९, ट्रॅव्हिस हेड २६; शाहीन शाह आफ्रिदी २/३९, नसीम शाह २/३६)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australia pakistan test series khwajas century missed australia awesome batting ysh

ताज्या बातम्या