सुपर ओव्हपर्यंत लांबलेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सरशी साधून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. निर्धारीत सामन्यात २२ धावांत तीन बळी मिळवण्यासह सुपर ओव्हरमध्ये अवघ्या पाच धावा देणारा जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

प्रथम फलंदाजी करताना जोश इंग्लिशच्या (४८) फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पथुम निसंकाच्या (७३) अर्धशतकामुळे श्रीलंकेने २० षटकांत ८ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र निर्णायक सुपर ओव्हरमध्ये निसंका-दसुन शनका यांना अवघ्या पाच धावाच करता आल्या. मग ग्लेन मॅक्सवेल-मार्कस स्टोयनिसने तीन चेंडूतच विजयी लक्ष्य गाठले. उभय संघांतील तिसरा सामना मंगळवारी खेळवण्यात  येईल.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
India Vs Australia Test Series 2024 Schedule Announced
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे