scorecardresearch

Premium

Australia Won World Cup 2023 Final: ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ट्रेविस हेड म्हणतो, “आज रोहित शर्मा जगातला सर्वात दुर्दैवी माणूस!”

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: ट्रेविस हेड म्हणतो, “मी माझ्या क्षेत्ररक्षणावर खूप काम केलं आहे. मी जशी शतक झळकावेन याची कल्पना केली नव्हती, तशीच रोहित शर्माचा असा…!”

travis head on rohit sharma marathi
ट्रेविस हेडची रोहित शर्माबाबतची प्रतिक्रिया व्हायरल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि तमाम भारतीयांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. गेल्या दीड महिन्यापासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर या पराभवामुळे आलेली निराशा स्पष्टपणे दिसत होती. ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ जल्लोष करत असताना दुसरीकडे भारतीय संघाच्या खेळाडूंना भावना अनावर होत होत्या. रडणाऱ्या मोहम्मद सिराजची जसप्रीत बुमरा समजूत काढत होता तर डोळ्यातले अश्रू कसेतरी आवरत रोहित शर्मा ड्रेसिंग रुमच्या दिशेनं जात होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ट्रेविस हेडनं सामन्यानंतर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

भारतानं दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर आलेल्या ट्रेविस हेडनं मार्नस लाबुशेनच्या साथीनं ऑस्ट्रेलियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. फक्त १२० चेंडूंमध्ये १३७ धावा करणाऱ्या ट्रेविस हेडनं भारताच्या हातून सामना अलगद ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला. त्यामुळेच सामनावीराचा खिताबही त्याला मिळाला. विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ट्रेविस हेडनं भारताचा कर्णधार रोहित शर्माविषयी केलेलं एक विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shubman Gill infected with dengue
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
apurva nemlekar
“तुमची मुलगी आहे का?” चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिले उत्तर, म्हणाली…
World Cup 2023: Ashwin's duplicate rejects the offer Kangaroos who is Mahesh Pithiya refused to train with Australia
World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?
Viral of Dhol Vadak
”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने हटके स्टाइलमध्ये घातली लग्नाची मागणी, अट एकच; VIDEO तुफान व्हायरल

रोहित शर्माचा झेल पकडणारा ट्रेविस हेड…

१३२ धावा करून ऑस्ट्रेलियाचा विजय साकार करणाऱ्या ट्रेविस हेडनंच भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माचा अफलातून झेल टिपत त्याला माघारी पाठवलं होतं. रोहित शर्मा ४७ धावांवर बाद झाला. यासंदर्भात ट्रेविस हेडला विचारणा केली असता त्यावर रोहित शर्मा आज कदाचित जगातला सर्वात दुर्दैवी व्यक्ती असेल, असं विधान ट्रेविस हेडनं केलं आहे.

Ind vs Aus Final: रोहित शर्मानं सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला, “कदाचित…!”

“रोहित शर्मा कदाचित आज जगातला सर्वात दुर्दैवी माणूस असेल. मी माझ्या क्षेत्ररक्षणावर खूप काम केलं आहे. मी जशी शतक झळकावेन याची कल्पना केली नव्हती, तशीच रोहित शर्माचा असा झेल मी घेईन याचीही मी कधी कल्पना केली नव्हती. तो झेल टिपल्यानंतर मला त्याचा मनस्वी आनंद झाला”, असं ट्रेविस हेडनं आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

ट्रेविस हेड सुरुवातीला नर्व्हस होता!

दरम्यान, आपण सुरुवातीला नर्व्हस होतो, हे ट्रेविस हेडनं कबूल केलं आहे. “मी सुरुवातीला थोडा नर्व्हस होतो. पण मार्नसनं उत्तम खेळ केला आणि सगळं दडपण स्वत:वर घेतलं. आमच्याआधी मिचेल मार्शनं ज्याप्रकारे खेळ करत आक्रमक फटके खेळले, ते पाहून आम्हाला अंदाज आला होता की खेळपट्टी आता फलंदाजीसाठी आणखी चांगली होत जाईल. त्यामुळे आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय अगदी योग्य होता”, असंही ट्रेविस हेडनं सांगितलं.

Ind vs Aus Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

ट्रेविस हेडनं मार्नस लाबुशेनच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी तब्बल १९२ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. शेवटच्या तीन धावा शिल्लक असताना तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारत ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australia travis head says rohit sharma most unluckiest man after icc cricket world cup 2023 final win pmw

First published on: 20-11-2023 at 00:06 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×