ऑस्ट्रेलियाचा ‘जोश’पूर्ण विजय!

आफ्रिकेने दिलेले ११९ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने १९.४ षटके घेतली. आफ्रिकेच्या वेगवान माºयापुढे त्यांची एक वेळ ३ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली होती. कर्णधार आरोन फिंच (०), डेव्हिड वॉर्नर (१४) आणि मिचेल मार्श (११) यांना छाप पाडता आली नाही. परंतु स्टीव्ह स्मिथ (३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (१८) यांनी चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भर घालून डाव सावरला. मात्र दोघेही लागोपाठच्या षटकांत माघारी परतल्यावर स्टोयनिसने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सहा चेंडूंत आठ धावांची गरज असताना स्टॉयनिसने दोन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला.

हेझलवूड, स्टोयनिस यांच्यामुळे रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी राखून मात

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (२/१९) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली.

आफ्रिकेने दिलेले ११९ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने १९.४ षटके घेतली. आफ्रिकेच्या वेगवान माºयापुढे त्यांची एक वेळ ३ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली होती. कर्णधार आरोन फिंच (०), डेव्हिड वॉर्नर (१४) आणि मिचेल मार्श (११) यांना छाप पाडता आली नाही. परंतु स्टीव्ह स्मिथ (३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (१८) यांनी चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भर घालून डाव सावरला. मात्र दोघेही लागोपाठच्या षटकांत माघारी परतल्यावर स्टोयनिसने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सहा चेंडूंत आठ धावांची गरज असताना स्टॉयनिसने दोन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला.

तत्पूर्वी, हेझलवूडसह अन्य गोलंदाजांनी टिचून मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला ९ बाद ११८ धावांत रोखले. त्यांच्याकडून फक्त एडिन मार्करमने (४०) एकाकी झुंज दिली. हेझलवूडने क्विंटन डीकॉक (७) आणि ऱ्हासी व्हॅन डर दुसेन (२) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. त्याला अ‍ॅडम झम्पा आणि मिचेल स्टार्क यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या गटात गुणांचे खाते उघडले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ९ बाद ११८ (एडिन मार्करम ४०; जोश हेझलवूड २/१९, अ‍ॅडम झम्पा २/२१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १९.४ षटकांत ५ बाद १२१ (स्टीव्ह स्मिथ ३५, मार्कस स्टोयनिस नाबाद २४; आनरिख नॉर्किए २/२१)

’ सामनावीर : जोश हेझलवूड

’ गुण : ऑस्ट्रेलिया २, दक्षिण आफ्रिका ०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia victory with five wickets in an over south africa akp