ऑस्ट्रेलियाची मालिका भारतासाठी खडतर

फिल ह्य़ुजेसला विजयी श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतुर असेल आणि त्यामुळे निर्धाराने ही मालिका जिंकण्याचा ते प्रयत्न करतील.

फिल ह्य़ुजेसला विजयी श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतुर असेल आणि त्यामुळे निर्धाराने ही मालिका जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळे भारतासाठी ही मालिका खडतर असेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले आहे.
‘‘आपल्या दिवंगत मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. हे भारतीय संघालाही चांगलेच माहिती असेल, पण तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या पद्धतीने मैदानात उतरेल ते पाहणे उत्सुकतेचे असेल. या परिस्थितीतून ऑस्ट्रेलियाचा संघ कशा पद्धतीने बाहेर पडतो, हे पाहावे लागेल. पण त्यांचे ध्येय हे विजयानिशी ह्य़ुजेसला श्रद्धांजली वाहणे हेच असेल,’’ असे अक्रम म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia will hit india hard in test series says wasim akram

Next Story
विजयी भव !