scorecardresearch

Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? BCCI नं शेअर केला VIDEO!

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण बरंच काही सांगून जात होतं…

team india dressing room after world cup final
अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारताची ड्रेसिंग रूम… (फोटो – बीसीसीआय)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर अंतिम सामन्यानंतर निराशा असल्याचं दिसत होतं. मोहम्मद सिराज व कर्णधार रोहित शर्मा यांना भावना आवरणंही कठीण जात होतं. त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना दु:खी करत होते. भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय क्रिकेट चाहते आपल्या संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे भारतीय चाहते टीम इंडियाला विश्वास देत असताना दुसरीकडे खुद्द संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होतं?

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. भारतानं विजयासाठी दिलेलं २४१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या चिवट पण तितक्याच आक्रमक १९२ धावांच्या भागीदारीचा मोठा वाटा होता. या पराभवाचं शल्य भारतीय संघाबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या मनात जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही फार वेगळं वातावरण नव्हतं.

Captain Rohit gets emotional before starting World Cup campaign Said Being an Indian player is not easy
IND vs AUS, World Cup: विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कॅप्टन रोहित झाला भावूक; म्हणाला, “भारतीय खेळाडू होणे सोपे…”
Rohit Sharma's press conference in World Cup 2023
IND vs AUS: रोहित शर्माने संघाची तयारी आणि शुबमन गिलच्या फिटनेसबद्दल दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या
Ashwin batting practice video Viral
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

Australia Won World Cup 2023 Final: वर्ल्ड कपची ट्रॉफी पायाखाली! मिशेल मार्शच्या ‘या’ कृतीवरून वादंगाची शक्यता

राहुल द्रविड म्हणतो…

अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं आपल्या भावना व्यक्त केल्या. “सर्वच खेळाडूंचा अपेक्षाभंग झाला आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड भावनिक वातावरण होतं. एक प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांना असं पाहाणं फार अवघड होतं. त्यांनी या स्पर्धेसाठी केलेल्या असंख्य तडजोडी आणि केलेली प्रचंड मेहनत आपण सगळ्यांनी पाहिली आहे”, असं राहुल द्रविडनं म्हटलं. याचबरोबर आज बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधला व्हिडीओ शेअर केला आहे. पराभवाची निराशा प्रत्येक भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाकडून उत्तम क्षेत्ररक्षणसााठी दिल्या जाणाऱ्या ‘मेडल सेरेमनी’ची दृश्य आहेत. अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत. पहिल्या सामन्यात विराट कोहलीला हे मेडल देण्यात आलं होतं. अंतिम सामन्यातही विराट कोहलीचा हे मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवलं.

Australia Won World Cup 2023 Final: पराभवानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? कोच राहुल द्रविड म्हणाला, “त्यांना तसं पाहाणं…”

“मित्रांनो, मला माहिती आहे की हे सगळं कठीण आहे आणि आपल्या सर्वांनाच या गोष्टीचं दु:ख होतंय. पण त्यालाच तर खेळ म्हणतात. आपण जे जे शक्य होतं, ते सगळं अगदी व्यवस्थित केलं. पण तरी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही. पण मला वाटतं जसं राहुल द्रविडनं सांगितलं, आपल्या सगळ्यांना स्वत:चा अभिमान वाटायला हवा. मी या संघातल्या प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुम्ही क्षेत्ररक्षणात स्वत:ला झोकून दिलं. क्षेत्ररक्षणात प्रचंड ऊर्जा आणली. सगळ्यांनी उत्तम कामगिरी केली”, असं दिलीप ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले.

इथे पाहा संपूर्ण Video…

विराट कोहलीच्या कामगिरीचं कौतुक

“या संपूर्ण स्पर्धेत आपण काही सर्वोत्तम झेल पकडले. पण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे आपण मैदानावर एकमेकांसाठी उभे राहिलो. आजचा क्षेत्ररक्षणातला विनर विराट कोहली आहे. तो एक भन्नाट खेळाडू आहे. तो स्वत: इतरांसाठी सर्वोत्तम उदाहरण घालून देतो. प्रत्येक वेळी तो मैदानावर जातो तेव्हा जादू करतो. सगळ्यात उत्तम बाब म्हणजे तो फक्त त्याची जबाबदारी पार पाडत नाही, तर त्याची कृती अनेकांना प्रोत्साहन देते”, अशा शब्दांत टी दिलीप यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australia win icc cricket world cup 2023 final defeat india dressing room virat kohli rahul dravid pmw

First published on: 20-11-2023 at 13:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×