दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करता येतात, असे म्हटले जाते. शिवाय संकटकाळात आहेत त्या गोष्टींची मदत घेऊन आपण आपला प्रवास सुरू ठेवतो. याचीच प्रचिती ऑस्ट्रेलियाची कॅनोइस्ट जेस्सिका फॉक्सने घडवली आहे. जेस्सिकाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कायाकिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. हे पदक तिला एका कंडोमचा वापर केल्यामुळे मिळाले आहे. तिला एका दुसऱ्या इवेंटमध्ये सुवर्णपदकही मिळाले आहे.

जेस्सिकाची ही गोष्ट ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. तिची जुनी कायाक (नौका) तुटली होती. तिने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मिळालेल्या कंडोमचा वापर तुटलेल्या कयाकसाठी केला. कंडोमचा वापर करत आणि एक शक्कल लढवत तिने ही कायाक ठीक केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jessica Fox (@jessfox94)

नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जेस्सिकाने या गोष्टीचा खुलासा केला. ”तुटलेली कायक दुरुस्त करण्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजमधून मिळालेला एक कंडोम वापरला होता. तिची युक्तीही कामी आली. या युक्तीच्या आधारे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी झाली आहे”, असे २७ वर्षीय जेस्सिकाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितले.

हेही वाचा – VIDEO : जिंकलस मित्रा..! मॅच हरल्यानंतर भारताच्या ‘गब्बर’नं दाखवली खेळभावना

जेस्सिका पुढे म्हणाली, ”मला वाटते, की मी माझ्या मनात ही शर्यत लाखो वेळा पाहिली असेल. कदाचित मी आज इतकी घाबरली नव्हती. माझी दृष्टी थोडी अस्पष्ट होती आणि मी कुठे होती आणि ते पुरेसे आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करीत होती. ऑलिम्पिकमध्ये काय होणार आहे हे आपणास कधीच ठाऊक नसते. आपल्याला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते.”

फ्रान्समध्ये जन्मलेली जेस्सिका फॉक्स तीन वेळा कॅनॉन स्लॅलम के वन वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिने २०१६ला रिओ डी जानेरोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१२ला लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

ऑलिम्पिक आणि कंडोमची परंपरा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.