scorecardresearch

Australian Cricket ने जाहीर केले अवॉर्ड्स; वॉर्नर-स्टॉइनिसला मिळाला मोठा पुरस्कार, पाहा सर्व विजेत्यांची लिस्ट

Australian Cricket Awards: क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने आपले पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सीएने पुरस्कार दिले आहेत. ज्यामध्ये डेव्हिड वार्नरपासून ऍशले गार्डनरपर्यंतच्या खेळाडूंचा समावेश आहे.

Australian Cricket Awards List
पॅट कमिन्स (फोटो-ट्विटर)

सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सिडनी येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला. डॅशिंग अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसची पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड म्हणून निवड करण्यात आली.

वॉर्नरने तिसऱ्यांदा पुरुषांचा वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे. ३६ वर्षीय वॉर्नर मतदानाच्या काळात ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ४२.४६च्या सरासरीने ५५२ धावा केल्या. ज्यात चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. त्याने एमसीजी येथे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १०६ धावा केल्या होत्या. जवळपास तीन वर्षांतील त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते.

स्टॉइनिसने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. ३३ वर्षीय खेळाडूने ३१.५४च्या सरासरीने आणि १६८.५च्या स्ट्राइक रेटने ३४७ धावा केल्या. शिवाय ८ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा स्टॉइनिस हा ऑस्ट्रेलियने खेळाडू ठरला. पर्थ स्टेडियमवर त्याने श्रीलंकेविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

त्याच वेळी, बेथ मुनी महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर ठरली. मतदानाच्या काळात ५९४ धावा केल्याबद्दल मुनीने हा पुरस्कार पटकावला. तिने वर्षातील महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर खेळाडूच्या शर्यतीत मॅग लॅनिंगला केवळ एका मताने पराभूत केले. मूनी यांना २५ तर लॅनिंग यांना २४ मते मिळाली. ताहलिया मॅकग्राला महिला टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. मॅकग्राने गेल्या वर्षी १६ सामन्यांत ६२.१४ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या होत्या. २७ वर्षीय खेळाडूने २०२२ मध्ये १३ विकेट्सही घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार विजेते –

बेटी विल्सन यंग क्रिकेटर ऑफ द इयर – कोर्टनी सिप्पल
ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द इयर – लान्स मॉरिस
महिला डोमेस्टिक प्लेयर ऑफ द ईयर- अॅनाबेल सदरलँड
पुरुष डोमेस्टिक प्लेयर ऑफ द ईयर- मायकेल नेसर
पुरुष वनडे प्लेयर ऑफ द इयर- डेव्हिड वॉर्नर
पुरुष टी-२०आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर – मार्कस स्टॉइनिस
महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर – बेथ मुनी

महिला टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर – ताहलिया मॅकग्रा
बीबीएल १२ प्लेयर ऑफ द इयर- मॅट शॉर्ट

हेही वाचा –Murali Vijay Retirement: मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली आहेत १२ शतकं

डब्ल्यूबीबीएल ०८ प्लेयर ऑफ द इयर – ऍशले गार्डनर
शेन वॉर्न टेस्ट प्लेअर ऑफ द इयर आणि कम्युनिटी चॅम्पियन अवॉर्ड – उस्मान ख्वाजा
वूलवर्थ्स क्रिकेट ब्लास्टर ऑफ द इयर – माबेल टोवे
ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेले – मार्ग जेनिंग्ज आणि इयान रेडपाथ

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:25 IST