scorecardresearch

अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय.

ANDRY SYMONDS AND SHANE WARNE
अॅन्ड्र्यू सायमंड्स आणि शेन वॉर्न (फोटो- roysymonds या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय. अवघ्या दोन महिन्यांत ऑस्ट्रेलियाने तीन दिग्गज गमावले आहेत. अ‍ॅन्ड्र्यू सायमंट्स, शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या जाण्याने क्रिकेट जगताची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे.

हेही वाचा >>> Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचे वयाच्या ४६ व्या वर्षी १४ मे रोजी निधन झाले. याआधी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचे थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सायमंड्स शेन वॉर्नच्या आदरांजली सभेला मेलबॉर्न येथील स्टेडियममध्ये हजर होता. त्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेपटू रॉड मार्श यांचेदेखील वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?

वाईट योगायोग

रॉड मार्श यांचे निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करणारे एक ट्विट शेन वॉर्नने केले होते. रॉड मार्श यांचे निधन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेन वॉर्नचेही निधन झाले. त्यामुळे रॉड मार्श यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट शेन वॉर्नचे शेवटचे ठरले. तर दुसरीकडे १४ मे रोजी निधन झालेल्या अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सनेही शेन वॉर्नच्या निधनांतर दु:ख व्यक्त करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. इन्स्टाग्रामवरील ही पोस्ट सायमंड्सची अखेरची ठरली.

हेही वाचा >>> ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम, अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

या तिन्ही दिग्गजांनी आपापला काळ गाजवलेला आहे. त्यांनी क्रिकेटसाठी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian cricketer andrew symonds last post on shane warne shane warne last post was rod marsh prd

ताज्या बातम्या