scorecardresearch

Premium

डेव्हिड वॉर्नर झाला पीव्ही सिंधूचा ‘फॅन’; खास पोस्ट करून म्हणाला…

David Warner congratulate PV Sindhu: वॉर्नरने सुवर्णपदक विजेत्या सिंधूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

David Warner congratulate PV Sindhu

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय बॅटमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली. महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक केली. भारतातील चाहत्यांनी तिच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. मात्र, फक्त भारतातच नाही तर परदेशातही सिंधूचे चाहते आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही यात समावेश होतो. वॉर्नरने सुवर्णपदक विजेत्या सिंधूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुवर्णपदक विजेत्या पीव्ही सिंधूचा फोटो शेअर केला आहे. “शाबास पीव्ही सिंधू, आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केली,” असे कॅप्शन वॉर्नरने सिंधूच्या फोटोला दिले आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी कँडिसने प्रतिक्रिया दिली आहे. कँडिसने “खूप छान,” अशी कमेंट केली आहे.

Team India or Swiggy delivery boys fans split in team indias new orange training kit for world cup 2023
“अरे, हे स्विगी डिलिव्हरी बॉइज आहेत की टीम इंडिया”; नव्या ट्रेनिंग ड्रेसवरून खेळाडू झाले ट्रोल; युजर्स म्हणाले…
Video of woman dancing
“दिल धड़के दर्द कलेजे में” गाण्यावर मेट्रोत थिरकली तरुणी, डान्स पाहून सपना चौधरीलाही विसरून जाल
Babar Azam Trolled After Facing Penalty For Overspeeding
लायसन्स नाही, ओव्हरस्पिडिंग केलं मग काय? पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला वाहतूक पोलिसांनी सुनावलं
Artist creates SRK portrait
SRK लेटर्सचा वापर करून बनवलं शाहरुख खानचं जबरदस्त पोट्रेट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “जबरा फॅन…”

डेव्हिड वॉर्नरला भारताविषयी आणि भारतातील लोकांबद्दल किती प्रेम आहे, हे तो वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवून देत असतो. भारतीय चित्रपटांतील गाण्यांचे डान्स व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

हेही वाचा – ट्रेंट बोल्टचा मोठा निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार

दोन वेळच्या ऑलिंपिक पदक विजेत्या सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते. २०१४मध्ये तिने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मात्र, वैयक्तिक सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली होती. यावर्षी मात्र तिने अचूक खेळ करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या कामगिरीचे डेव्हिड वॉर्नरनेही कौतुक केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian cricketer david warner congratulate pv sindhu through instagram post vkk

First published on: 10-08-2022 at 12:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×