ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : तब्बल १२ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद मिळवून खळबळ माजवणारा युकी भांब्री पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन भूमीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षांत विविध दुखापती आणि करोनाचा समर्थपणे मुकाबला केल्यानंतर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पात्रता फेरीद्वारे दमदार पुनरागमन करण्याचे २९ वर्षीय युकीचे ध्येय आहे.

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून सोनी क्रीडा वाहिन्यांवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. २०१८मध्ये अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळणाऱ्या युकीची पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात पोर्तुगालच्या जो डॉिमगोसशी गाठ पडणार आहे.

‘‘ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला माझ्या आयुष्यात नेहमीच खास स्थान असेल. गेला काही काळ माझी मानसिक आणि शारीरिक कस पाहणारा ठरला. परंतु या सर्वावर मात करत पुन्हा कोर्टवर परतल्याचा आनंद आहे,’’ असे युकी म्हणाला.

युकीच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून गतवर्षी एप्रिलमध्ये त्याला करोनाची लागण झाली. ‘‘भारताकडे सध्या असंख्य प्रतिभावान टेनिसपटू आहेत. त्यामुळे लवकरच आपले खेळाडू ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या जवळ पोहोचतील. रामनाथन-बोपण्णा यांनी अ‍ॅडलेड स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास बळावला असेल. २०२२ हे वर्ष भारतीय टेनिससाठी लाभदायी ठरेल, ’’ असे युकीने सांगितले. युकीव्यतिरिक्त पात्रता फेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन हे भारतीय टेनिसपटू खेळताना दिसतील. महिला एकेरीत अंकिता रैना एकमेव भारतीय खेळाडू असेल. जैव-सुरक्षा परिघातील कठोर नियम रद्द करून खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची आयोजकांनी काळजी घ्यावी, असेही युकीने सुचवले आहे.

जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करणे चुकीचे

वैद्यकीय सवलत मिळाल्याच्या प्रमाणपत्रासह जोकोव्हिच ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्याचा व्हिसा रद्द करणे चुकीचे आहे, असे मत युकीने व्यक्त केले. ‘‘जोकोव्हिच प्रकरणात सुस्पष्टतेचा अभाव दिसला. यासंबंधी मी अधिक बोलू इच्छित नाही. आता ऑस्ट्रेलियात दाखल झालाच आहे, तर या स्पर्धेत खेळेलच असे दिसते. मात्र त्याचा व्हिसा रद्द केल्यामुळे प्रकरण पेटू शकते,’’ असे युकी म्हणाला.