Australian Open: ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात संपन्न झाला. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्‍सित्‍सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकिर्दीतील हे एकूण २२वे ग्रँडस्लॅम आहे.

विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्‍सित्‍सिपासमध्‍ये जे जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्‍ये नंबर वन होईल आणि हा सामना जिंकून शेवटी जोकोविचचं विजयी ठरला.

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

जोकोविचने १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली. याआधी जोकोविचने नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे आणि प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले होते. २०२२ मध्ये, जोकोविच व्हिसाच्या कारणांमुळे ही स्पर्धा खेळू शकला नाही आणि राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले. मात्र त्याचे उट्टे काढत त्याने २०२३चे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

जोकोविचचे २२वे ग्रँडस्लॅम जिंकले

जोकोविच २२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरला होता. याआधी त्याने नऊ ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि तीन यूएस ओपनसह एकूण २१ ग्रँडस्लॅम जिंकले होते. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत फक्त राफेल नदाल जोकोविचच्या पुढे होता. नदालकडे २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता त्याने नदालची बरोबरी करत २२ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले.