स्वयंसिद्धतेच्या जिद्दीचे फलित -वॉर्नर

आयपीएलमधील अपयशामुळे मला स्वत:लाच माझ्या क्षमतेविषयी विविध प्रश्नांनी भेडसावले

दुबई : टीकाकारांची तोंडे बंद करण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याच्या जिद्दीमुळेच सूर गवसला व ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरण्यात मला यश आले, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली.

‘आयपीएल’मधील सुमार कामगिरीमुळे वॉर्नरची सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याबरोबरच अखेरच्या काही सामन्यांसाठी त्याला वगळण्यात आले. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव लढतींमध्येही वॉर्नर एकेरी धावांतच बाद झाला. परंतु विश्वचषकात तीन अर्धशतकांसह त्याने २८९ धावा केल्या.

‘‘आयपीएलमधील अपयशामुळे मला स्वत:लाच माझ्या क्षमतेविषयी विविध प्रश्नांनी भेडसावले. परंतु मी खचलो नाही. विश्वचषकात फक्त मूलभूत घटकांवर भर दिला. त्यामुळे स्वत:ला सिद्ध केल्याचा अभिमान आहे,’’ असे वॉर्नर म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australian opener david warner reaction after winning t20 world cup zws

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या