scorecardresearch

Premium

World Cup Cricket: वजन कमी करण्यासाठीचं औषध घेतलं आणि साक्षात शेन वॉर्न ड्रग्ज टेस्टमध्ये अडकला

World Cup Cricket: वर्ल्डकपमधला पहिला सामना काही तासांवर असताना संघातील प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर जाणं धक्कादायक होतं. काय झालं होतं नेमकं तेव्हा?

shane warne dope test
फिरकीचा जादूगार डोपच्या जाळ्यात (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत धोकादायक मानला जातो. २००३ वर्ल्डकपचे पडघम वाजू लागल्यानंतर जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून ऑस्ट्रेलियाचंच नाव घेतलं जात होतं. शेन वॉर्न या संघाचा अविभाज्य भाग होता. वॉर्नची जादुई फिरकी प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखीच ठरते. वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असताना वॉर्नबाबत एक बातमी आली आणि खळबळ उडाली. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने वॉर्नवर वर्षभराची बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपमधला पहिला सामना काही तासांवर आला होता. बंदीमुळे वॉर्न संपूर्ण स्पर्धेतच खेळू शकणार नाही हा धक्का प्रचंड होता. गोलंदाजी डावपेच बदलावं लागणं ओघानं आलंच. वॉर्नची जागा घेऊ शकेल असा फिरकीपटू ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नव्हता. वॉर्नची उणीव कशी भरुन काढायची हाही प्रश्न निर्माण झाला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वत: यासंदर्भात घोषणा करुन माहिती दिली. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने वॉर्नला मायदेशी पाठवलं जात असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं. वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मोड्युरेटिक औषधातील घटक वॉर्नच्या नमुन्यात आढळला होता. डायुरेटिक औषधांमुळे शरीरातील अतिरिक्त पाणी लघवी किंवा अन्य मार्गाने बाहेर जातं. या औषधातील घटक आयसीसीतर्फे प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत होता.

World Cup 2023 IND vs AUS Match Updates
World Cup 2023, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रिडीक्शनसह, जाणून घ्या सर्व काही
Cricket field became a war arena Bangladeshi players beat each other with bats 6 people admitted to hospital
Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS: के. एल. राहुलने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर ट्रोल, पाहा VIDEO
World Cup 2023: Family members of New Zealand players announced the World Cup team video going viral
NZ ODI WC 2023 Squad: आई, बायको, मुलं, आजी- न्यूझीलंडच्या वर्ल्डकप संघाची अनोखी घोषणा; Video व्हायरल

आणखी वाचा: World Cup Cricket : पेटलेलं इडन गार्डन्स आणि ओक्साबोक्शी रडणारा विनोद कांबळी

वर्ल्डकपच्या साधारण वर्षभर आधीपासून वॉर्न वजन कमी करण्यासाठीचे उपचार घेत होता. त्याचं वजन कमी होऊही लागलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली पण तो त्यातूनही सावरला. २००३ वर्ल्डकपमध्ये दमदार प्रदर्शनासह क्रिकेटला अलविदा करण्याचा त्याचा विचार होता पण या बातमीने सगळंच विस्कटून गेलं.

आणखी वाचा: World Cup Cricket: मॅच सुरू असताना कोच-कॅप्टन यांच्यात इअरपीसद्वारे गुजगोष्टी; सामनाधिकाऱ्यांची कारवाई

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. ‘शेन वॉर्नने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या नमुन्यात प्रतिबंधित घटक आढळला आहे. मायदेशी परतल्यानंतर तो आणखी काही चाचण्यांना सामोरा जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या उत्तेजकविरोधी प्रक्रियेचा तो भाग होईल.

आम्ही वॉर्नला यासंदर्भात समजावलं आहे. आम्ही आयसीसीला याची कल्पना दिली असून वॉर्नऐवजी बदली खेळाडूच्या प्रवेशासाठी परवानगी मागितली आहे’.

वॉर्नने स्वत: यासंदर्भात सांगितलं की, ‘मला या बातमीने प्रचंड धक्का बसला आहे. मी उन्मळून गेलो आहे. कामगिरीत सुधारणेसाठी मी कोणतंही उत्तेजक घेतलेलं नाही. सिडनीत सामन्याआधी मी औषध घेतलं. पण त्यात प्रतिबंधित घटक असेल याची मला जराही कल्पना नव्हती.

संघाचं हित लक्षात घेऊन मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मी बोर्डाला यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करीन. माझ्या आधीच्या चाचण्यांचे निकाल निगेटिव्ह आले आहेत. मी कोणत्याही स्वरुपाचं कामगिरीत सुधारणेसाठीचं उत्तेजक घेतलेलं नाही. मी संघ सहकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे’.

आणखी वाचा: World Cup Cricket: वेस्ट इंडिजच्या गतवैभवाच्या राहिल्या फक्त आठवणी…

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला यासंदर्भात विचारलं असता तो म्हणाला, ‘वॉर्नसारख्या मोठ्या खेळाडूबाबत असं होणं दुर्देवी आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना काही तासांवर आला आहे. त्याआधी असं होणं योग्य नाही’.

वॉर्न संपूर्ण स्पर्धेसाठी अनुपलब्ध झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तातडीने ब्रॅड हॉगला संघात समाविष्ट करण्यासाठी आयसीसीकडे परवानगी मागितली. हॉगच्या समावेशाला परवानगी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रमुख फिरकीपटूविना स्पर्धेत खेळायला उतरला. दुसरा एखादा संघ असता तर त्यांचं मनोधैर्य खच्ची झाली असतं पण ऑस्ट्रेलियाची ताकद हीच आहे की ते एकीचं बळ दाखवतात.

वॉर्नविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत एकही सामना न गमावता विश्वविजेतेपदावर कब्जा केला. वर्ल्डकपविजेत्या संघाला जी बक्षीस रक्कम देण्यात आली ती वॉर्नला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर टीकाही झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian spin wizard took medicine to reduce weight caught in dope test psp

First published on: 02-10-2023 at 18:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×