scorecardresearch

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी माजी सुपरकार रेसर बनली पॉर्नस्टार

मी जे काम करतेय त्यातून मला आनंद मिळतोय !

Renee Gracie
रेनी ग्रेसी

ऑस्ट्रेलियाची माजी महिला सुपरकार रेसर रेनी ग्रेसी हिने आपली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. रेनीने पॉर्न बेवसाईट आणि फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी सुपरकार रेसिंगमध्ये आपल करिअर सुरुवात केलेल्या रेनीने आतापर्यंत आश्वासक कामगिरी केली होती. मात्र घरातली परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला आतापर्यंत अनेक महत्वाच्या संधी पैशांच्या अभावी सोडून द्याव्या लागल्या होत्या. २०१५ साली रेनीने आपली मैत्रिण सिमोना डी सिल्वस्ट्रो हिच्यासोबत Bathurst या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सुपरकार रेसमध्ये भाग घेतला होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अखेरीस रेनीला सुपरकार रेसिंग सोडावं लागलं.

यानंतर काहीकाळ रेनीने आपल्या घराजवळ कार यार्डात काम केलं. पण पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे अखेरीस तिने पॉर्नस्टार बनण्याचा निर्णय घेतला. आपल्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी मी हवे तेवढे पैसे कमावू शकत नव्हते. यामुळे अखेरीस मी पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतल्याचं रेनीने सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2020 at 16:30 IST