scorecardresearch

पॅट कमिन्स विश्वचषक ट्रॉफीसह पोहोचला साबरमती नदीच्या काठावर, आलिशान क्रूझवर काढले फोटो, पाहा VIDEO

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: एएनआय या वृत्तसंस्थेने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो साबरमतीमधील क्रूझवर डब्ल्यूसीसोबत फोटो काढताना दिसत आहे.

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
पॅट कमिन्स विश्वचषक ट्रॉफीसह आलिशान क्रूझवर काढले फोटो (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pat Cummins poses with the ICC World Cup trophy on a Sabarmati river cruise boat: ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये जल्लोषाचे वातावरण अजून कायम आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो साबरमती नदीवरील क्रूझवर ट्रॉफीसोबत फोटोशूट करताना दिसत आहे. यावेळी इतर लोकही तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना न्यूज एजन्सीने लिहिले आहे की, ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबादमधील साबरमती नदीच्या क्रूझवर वर्ल्ड कपसोबत पोज देताना.’

पॅट कमिन्स या विजयाने खूप आनंदी –

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार खूप आनंदी आहे. सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ‘माझ्या मते गेल्या सामन्यातील आमची सर्वोत्तम कामगिरी आम्ही राखून ठेवली होती. तसेच मोठ्या सामन्यांमध्ये काही खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी समोर आली आहे.’

IND vs AUS 3rd ODI Match Updates
IND vs AUS 3rd ODI: स्टीव्ह स्मिथने २० धावा करताच गाठला मोठा टप्पा, वॉर्नर आणि फिंचच्या खास क्लबमध्ये झाला सामील
World Cup 2023: Will Virat Kohli retire from ODI and T20 after the World Cup Big claim from a close friend AB de Villiers
AB de Villiers: वर्ल्डकपनंतर विराट कोहली वन डे आणि टी२० मधून निवृत्ती घेणार? एबी डिव्हिलियर्सने केला मोठा दावा
IND vs AUS 2nd ODI Match Updates
VIDEO: के. एल. राहुलने कॅमेरून ग्रीनला दाखवले दिवसा तारे, असा खणखणीत षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियम बाहेर गेला
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS: के. एल. राहुलने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर ट्रोल, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, ‘लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय योग्य ठरेल, असे सामन्यापूर्वी आम्हाला वाटले होते. खेळपट्टी खूपच संथ दिसत होती. फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नव्हती. आम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ज्याचा आम्हाला फायदा झाला.’

हेही वाचा – आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, चॅम्पियन कर्णधाराला मिळाले नाही स्थान; भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – VIDEO: फायनलमधील पराभवानंतर गौतम गंभीरने जिंकली भारतीयांची मनं; म्हणाला, “केवळ जिंकणारा संघच…”

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian team captain pat cummins poses with the icc world cup trophy on a sabarmati river cruise boat in ahmedabad vbm

First published on: 20-11-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×