सध्या भारताचे दोन क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहेत. एक संघ एजबस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध निर्णायक कसोटी सामना खेळण्यात व्यग्र आहे तर टी २० संघ सराव सामने खेळत आहे. आयर्लंडविरुद्धची टी २० मालिका जिंकल्यानंतर तोच संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंड विरुद्धची तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू होण्यास आणखी वेळ असल्याने खेळाडूंना निवांत वेळ मिळाला आहे. रविवारी नॉर्थ हॅम्पशायरविरुद्धच्या सराव सामन्यातील विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू मस्ती करताना दिसले.

भारतीय संघातील तारांकित फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील ईशान किशन, आवेश खान हे खेळाडू संघाच्या बसमध्ये बसून हिंदी गाणी म्हणत आहेत. त्यांना अक्षर पटेल आणि इतर खेळाडूंनीदेखील साथ दिली आहे. चहलने स्टोरीला शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडूंनी ‘दुल्हे का सेहरा सुहाना लगता है’ या गाण्याचा सूर लावल्याचे दिसले.

युझवेंद्र चहलने शेअर केलेल्या स्टोरीतील स्क्रीनशॉट

यापूर्वी भारताचा तारांकित खेळाडू ईशान किशनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि स्वत: ईशान किशन मैदानाच्याकडेला बसलेले दिसले होते. गंमत म्हणजे ते बसून लहान मुलांचा एक खेळ खेळताना दिसले होते. भारतीय संघातील हे तिन्ही धडाडीचे खेळाडू ‘चिड़िया उड़, मैना उड़’ खेळ खेळत होते.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : समालोचन करताना घसरली सेहवागची जिभ; दिग्गज खेळाडूला म्हणाला ‘छमिया’

एकूणच, इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मनसोक्त मस्ती करत आहेत. भारत विरुद्ध इंग्लंडचा एजबस्टन कसोटी सामना संपल्यानंतर ७ जुलैपासून तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे.