IPL 2026 Avesh Khan Rishabh Pant: आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात मोठी चूक झाली. या चुकीचा फटका विजेत्या लखनौ संघालाही बसला असता. लखनौने या सामन्यात ५ विकेट्सने हैदराबादचा पराभव केला. पण आवेश खानची विजयी चेंडूवरील चूक लखनौ संघाला चांगलीच महागात पडली असती. हैदराबाद संघाने आवेश खानविरूद्ध अपील केलं असतं तर सामन्याच्या निर्णयावरही याचा परिणाम झाला असता.

या सामन्याचा अंतिम निकाल असा होता की, लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. पण, जर हैदराबादने आवेश खानच्या चुकीकडे दुर्लक्ष केलं नसतं तर परिस्थिती वेगळी असू शकली असती, अशी चर्चा संध्या रंगली आहे. हैदराबादने जर आवेश खानच्या फाऊलविरूद्ध अपील केलं असतं तर एलएसजीने जिंकलेला सामना हैदराबाद जिंकू शकला असता.

सामना जिंकण्यासाठी LSG संघाला अखेरच्या षटकातील शेवटच्या २ चेंडूंवर १ धाव काढण्याची गरज होती. ऋषभ पंत स्ट्राईकवर होता. त्याने जयदेव उनाडकटच्या षटकातील ५ व्या चेंडूवर मोठा फटका मारला, जो चौकारासाठी गेला. त्याचवेळी, सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या आवेश खानने चेंडू सीमारेषा ओलांडण्यापूर्वीच आपल्या बॅटने अडवण्याची चूक केली. क्रिकेटमध्ये याबाबत नियम आहेत. पण इथे हैदराबादने आवेश खानने काय केलंं याकडे कदाचित त्यांनी लक्ष दिले नाही.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसी आचारसंहिता, २०.१ नुसार, क्षेत्ररक्षकाव्यतिरिक्त इतर खेळाडूने हस्तक्षेप केल्यास चेंडू डेड बॉल घोषित केला जाऊ शकला असता. आयसीसी नियम ४१ नुसार, याला अनफेयर प्ले मानलं जाऊ शकलं असतं. त्या बदल्यात, पंचांनी सनरायझर्स हैदराबादला ५ धावांचा दंड ठोठावला असता.

आवेश खानने नियमांचं उल्लंघन केलं का?

एमसीसी क्रिकेटच्या नियमांनुसार, नियम १९ (बाऊंड्री) नुसार, जेव्हा चेंडू पहिल्यांदा सीमारेषेला किंवा त्यापलीकडील जमिनीला स्पर्श करतो, तेव्हा चौकार नोंदवला जातो. आवेश खानच्या प्रकरणात, पंतने मारलेला फटका मिड-ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याला चौकार घोषित करण्यात आलं. त्यामुळे आवेश खानच्या कृतीमुळे कोणताही दंड आकारला जाणार नाही, कारण चेंडू डेड मानला जातो.