Axar Patel Creates History: अक्षर पटेलने टी-२० क्रिकेट इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरात कोरलं आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या अक्षर पटेलने बॅट आणि चेंडूने अनेकदा मॅचविनिंग कामगिरी संघासाठी केली आहे. अक्षर पटेलने आता इंग्लंडविरूद्ध मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. वादळी फटकेबाजी करत असललेल्या हॅरी ब्रुकला अक्षर पटेलने माघारी धाडलं व संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह त्याने मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
अक्षर पटेल ५वं षटक टाकण्यासाठी आला. पहिल्याच षटकात इंग्लंडचे दोन सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेल्या हॅरी ब्रुकने येताच वादळी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. ब्रुकने अर्शदीप सिंगच्या षटकात २७ धावा कुटल्या, यानंतर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवरही जेकब बेथलसह त्याने धावा कुटल्या. अखेरीस अक्षर पटेलला गोलंदाजीला बोलावलं आणि त्याने कमालीचा चेंडू टाकत ब्रुकला बाद करत मोठी विकेट मिळवली.
अक्षर पटेलसाठी हॅरी ब्रुकची ही विकेट टी-२० क्रिकेटमधील १००वी विकेट ठरली. हॅरी ब्रुक टी-२० मध्ये १०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू ठरला. यापूर्वी कोणताच फिरकीपटू अशी कामगिरी करू शकलेला नाही. अक्षर पटेलने टाकलेला चेंडू ब्रुकच्या ग्लोव्हजला लागून इशानच्या हातात गेला, पण पंचांनी वाईड चेंडू दिला, पण इशान किशनने मोठं अपील करत श्रेयस अय्यरला आवाज ऐकू आल्याचं सांगत रिव्ह्यू घेण्यास सांगितलं. रिव्ह्यूमध्ये चेंडू ब्रुकच्या ग्लोव्हजला लागल्याने त्याला झेलबाद देण्यात आलं.
भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
अर्शदीप सिंग – १३३ विकेट्स
जसप्रीत बुमराह – १२१ विकेट्स
हार्दिक पंड्या – ११४ विकेट्स
अक्षर पटेल – १०० विकेट्स
युझवेंद्र चहल – ९६ विकेट्स
