scorecardresearch

अक्षरचे क्रिकेट ठुमके तुम्ही पाहिलेत का? स्वतः च्या लग्नातील डान्सचा मजेशीर VIDEO व्हायरल

Axar Patel Dance Video: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. लग्नाच्या फंक्शन्स दरम्यान त्याने पत्नी मेहासोबत स्टेजवर असा डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Axar Patel danced cricket steps
अक्षर पटेल (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने त्याची गर्लंफ्रेंड मेहाशी लग्न केले आहे. अक्षर पटेलने लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्याचबरोबर आता तो तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचाही भाग नाही. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अक्षरच्या खास डान्सचा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.

अक्षर पटेलने मेहासोबत ‘तेरे दिल से ना खेलूंगा’ गाण्यावर डान्स केला. किंगचे हे गाणे सध्या खूप लोकप्रिय झाले आहे. तेरे दिल से ना खेलूंगा, या गाण्यात या ओळी येताच अक्षरने त्याच्या नृत्यात फलंदाजी आणि झेल पकडण्याच्या स्टेप्सचा समावेश केला. अक्षरने आधी षटकार मारण्याची आणि नंतर झेल घेण्याची स्टेप्स करुन दाखवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अक्षर पटेल आणि मेहा मेहा वडोदर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. अक्षरची पत्नी मेहता ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.

हेही वाचा – IPL All Time XIमध्ये धोनीला कर्णधार करण्यावर प्रज्ञान ओझाने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘धोनीपेक्षा रोहित…’

अक्षर पटेलने गेल्या काही महिन्यांत टीम इंडियाला रवींद्र जडेजाची उणीव भासू दिलेली नाही. अक्षरने बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या