Axar Patel Stunning Catch Of David Miller IND vs SA: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील तो ऐतिहासिक झेल क्विचितच कोणी विसरेल. डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला आणि चेंडू षटकारासाठी सीमारेषेपलीकडे जाणार आणि हा सामना भारताच्या हातून निसटणार असंच चिन्ह होतं आणि नेमका तेव्हाच सीमारेषेजवळ सूर्यकुमार यादवने तो ऐतिहासिक झेल टिपत सामना भारताच्या बाजूने वळवला. असाच डेव्हिड मिलरचा झेल अक्षर पटेलने सेंच्युरियनच्या मैदानावर टिपला आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.

हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरची जोडी पुन्हा एकदा मैदानावर होती आणि गोलंदाजांची ताबडतोड धुलाई करत होती. अशातच कर्णधाराने १६ वे षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. हार्दिकने कर्णधाराला निराश न करता मिलरची विकेट मिळवत भारताने सामन्यात पुनरागमन केले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’

मिलरने हार्दिकच्या १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक दणदणीत षटकार खेचला. हार्दिक पाचव्या चेंडूवर मिलरला पुन्हा षटकार खेचण्याची संधी दिली पण सीमारेषेवर तैनात असलेल्या अक्षर पटेलने अनपेक्षित असा झेल टिपत मिलरला माघारी धाडले. मिलरचा तो फटका पाहून वाटत होतं की हा चेंडूही षटकारासाठी जाणार पण तितक्यात अक्षर पटेलने हवेत वर झेप घेतली आणि अफलातून झेल टिपला, हे पाहून सर्वच अवाक् झाले होते. जवळपास १० फूट उंचावरून जाणारा चेंडू अक्षरने ३-४ फूट हवेत झेप घेत टिपला. आफ्रिकन संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात डेव्हिड मिलरकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला १८ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.

हेही वाचा – IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेने मिलर बाद झाल्यानंतरही सामन्यावर आपली पकड ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. हेनरिक क्लासेन आणि मार्को जान्सेन यांनी आपल्या संघाला लक्ष्याच्या अगदी जवळ नेले. पण मिलरला बाद केल्यावर आफ्रिकन संघावर दडपण निर्माण झाले होते आणि याचा फायदा घेत भारताच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. मिलर बाद झाल्यानंतर आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाज मैदानावर आले होते.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

अर्शदीपने १८व्या षटकात क्लासेनला (४१) बाद केले. यानंतर गेराल्ड कोएत्झी आणि अँडिले सिमलेन मार्को यान्सेनला पाठिंबा देण्यासाठी आले. या सर्वांनी मिळून दक्षिण आफ्रिकेला २०० धावांच्या पुढे नेले, पण त्यांना यशस्वीपणे लक्ष्य गाठता आले नाही. यानसेन १७ चेंडूत ५४ धावा करून नाबाद परतला. भारताविरुद्ध टी-२० सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक आहे.