भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखऱ धवन आणि पत्नी आयेशाने घटस्फोट घेतला आहे. नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिखऱ धवन आणि आयेशाच्या घटस्फोटामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. आयेशाने आपल्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक भावनिक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये आयेशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. शिखर धवनकडून अद्याप यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं आहे –

“जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे. मी घटस्फोटित म्हणून पहिल्यांदा याचा अनुभव घेतला. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं,” असं आयेशाने म्हटलं आहे.

“मी प्रत्येकाला निराश करत असून स्वार्थी असल्याचंही वाटत होतं. मी माझ्या कुटुंबाला, मुलांना आणि काही प्रमाणात देवालाही निराश करत असल्याची भावना जाणवत होती. घटस्फोट हा किती घाणेरडा शब्द होता,” असं ती सांगते. ⠀

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटलं आहे की, “मग आता विचार करा, मला दुसऱ्यांदा यामधून जावं लागत आहे. हे भयानक आहे. याआधीही माझा घटस्फोट झाला असून दुसऱ्या वेळी माझं खूप काही पणाला होतं असं वाटत होतं. मला खूप काही सिद्ध करायचं होतं. पण जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हाही भीती वाटली. पहिल्यांदा ज्या भीती, अपयश आणि निराशा या भावना होत्या त्या पुन्हा तशाच आल्या”. दरम्यान यावेळी आयेशाने आपल्या अजून सबल झाल्यासारखं वाटत असल्याचंही म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आय़ेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.