Babar Azam Wicket: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. सामना सुरू होऊन काही मिनिटे होताच निम्मा संघ तंबूत परतला. कर्णधार बाबर आझमकडून या डावात तरी चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण तो ज्या पद्धतीने बाद होऊन परतला, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. बाबरचा बाद होण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची फ्लॉप सुरूवात…
या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. ही मालिका तर हातून गेली आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा आहे. पण या सामन्यातही पाकिस्तानकडून सुपर फ्लॉप सुरूवात पाहायला मिळाली आहे. बाबर आझम अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. तर झाले असे की, इंग्लंडकडून १५ वे षटक टाकण्यासाठी जोश टंग गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाबर आझम स्ट्राईकवर होता. त्यावेळी षटकातील शेवटचा चेंडू इतक्या भन्नाट वेगाने आला की, टप्पा पडताच बाबर आझमची बॅट येण्याआधीच ऑफ स्टम्प उडवून गेला. हे पाहून बाबर आझमलाही आश्चर्याचा धक्का बसला.
पाकिस्तानने या सामन्यासाठी आपल्या संघात ४ मोठे बदल केले आहेत. पण सामना सुरू होऊन काही मिनिटे उलटताच, सलामी जोडी तंबूत परतली. सईम अयुब शून्यावर माघारी परतला. मुख्य बाब म्हणजे, पाकिस्तानची सलामी जोडी या मालिकेत एकदाही दुहेरी आकडा देखील गाठू शकलेली नाही. सॅम अयूब गेल्या ४८ डावांत विक्रमी ९ वेळा तर शून्यावर बाद झाला आहे. पाकिस्तानने या डावात कशाबशा १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
पाकिस्तान: अजान अवैस, सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, गाझी घोरी (यष्टीरक्षक), मोहम्मद इम्रान रंधावा, रझाउल्ला, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली
इंग्लंड: बेन डकेट, एमिलियो गे, जॉर्डन कॉक्स, जो रूट (कर्णधार), हॅरी ब्रूक, डॅन लॉरेन्स, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), गस अॅटकिन्सन, ऑली रॉबिन्सन, जोफ्रा आर्चर, जोश टंग
