Babar Azam breaks Virat Kohli record : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वीच पाकिस्तानी संघाला इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-० ने गमावावी लागली आहे. चौथ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी संघाला इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज आणि फलंदाज चांगलेच फ्लॉप ठरले. टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानी संघाला झोपेतून उठवणार आहे. मात्र या सामन्यात बाबर आझमने छोटी खेळी खेळत विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

बाबर आझमने विराट कोहलीला मागे टाकले –

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. यासह तो इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबरच्या आधी हा विक्रम भारतीय सुपरस्टार विराट कोहलीच्या नावावर होता. आता बाबरने कोहलीचा हा विक्रम मोडीत काढला आहे. बाबरने इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये ६६० धावा केल्या आहेत. तर विराटने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मध्ये ६३९ धावा केल्या आहेत.

Smriti Mandhana fan Adeesha Herath video
Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO
Sanju Samson 110m Six Video viral
Sanju Samson : सॅमसनने ११० मीटरचा षटकार ठोकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Yashasvi Jaiswal 13 run on 1st legal delivery
IND vs ZIM 5th T20 : भारताने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम! झिम्बाब्वेविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम
Yashasvi Jaiswal 13 run on 1st legal delivery in T20I
IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
India beat Zimbabwe by 10 wickets
IND vs ZIM 4th T20 : शुबमनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’, झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा
Zimbabwe beat India by 13 runs in 1st T20 Match
झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी
Watch: Rahul Dravid consoles heartbroken Virat Kohli after another cheap dismissal
IND vs ENG Semifinal : राहुल द्रविडने निराश विराटला दिला धीर, सांत्वन करतानाचा VIDEO व्हायरल
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल

इंग्लंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :

बाबर आझम- ६६० धावा
विराट कोहली- ६३९ धावा
ॲरॉन फिंच- ६१९ धावा
मोहम्मद रिझवान- ५६० धावा
मार्टिन गप्टिल- ४७१ धावा

हेही वाचा – Norway Chess 2024 : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने गमावली आघाडी, हिकारू नाकामुराविरुद्ध पराभूत

पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडसमोर सपशेल अपयशी –

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकाही पाकिस्तानी फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळे संघाने मालिका गमावली. याआधी पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही एक सामना गमावला होता. बाबर आझमने बऱ्याच वेळा चांगली सुरुवात नक्कीच करुन दिली, पण चांगल्या सुरुवातीचे त्याला मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. बाबर आझमने पाकिस्तान संघासाठी ११९ टी-२० सामन्यांमध्ये ४०२३ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – T20 WC 2024 : “तुमच्याकडे किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही…”, वर्ल्डकपपूर्वी ब्रायन लाराचा टीम इंडियाला इशारा

इंग्लंडचा पाकिस्तानवर ३ विकेट्सनी विजय –

चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १५७ धावांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकली नाही. उस्मान खानने संघाकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्यानंतर जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनी इंग्लंडला वेगवान सुरुवात करून दिली. सॉल्टने ४५ धावा केल्या. तर बटलर ३९ धावा करून बाद झाला. इंग्लंडने तीन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.